राज ठाकरे यांच्या चौकशीतून काही निघेल असं वाटत नाही : उद्धव ठाकरे
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा कोहिनूर मिल प्रकरणी इतर केल्या जाणाऱ्या चौकशीबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज अप्रत्यक्ष पाठिंबा जाहीर केला. मातोश्री येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर राज ठाकरे यांची पाठराखण करत ते म्हणाले की उद्याच्या चौकशीतून काही निष्पन्न होईल असं वाटत नाही.
आज मुंबईत मातोश्री येथे इगतपुरी मतदारसंघाचे आमदार निर्मला गावित यांच्या शिवसेना पक्ष प्रवेश प्रसंगी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केलं. याआधी सर्व विरोधी पक्षांनी राज ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. पण आपल्या मोठ्या दादू कडून आणि त्याचवेळेला एका विरोधकाकडून पाठिंबा मिळाल्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.