Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

कडक ‘लॉकडाऊन’ काळातही नवी मुंबईतील स्पा कोणाच्या मर्जीने चालू? टीम महाराष्ट्र वार्ता ने केली पोलखोल 

कोविड संसर्ग रोखण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला प्रशासनाकडून केराची टोपली

नवी मुंबई, दि.३१(सुप्रिया मयेकर): आज घडीला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशासह राज्यात हाहाकार माजवला असून सरकारने सबंध राज्यात संचारबंदी कम लॉकडाऊन लागू केली आहे. या अशा गंभीर परिस्थितीतही नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एक स्पा खुलेआम चालू असल्याची माहिती टीम महाराष्ट्र वार्ता ला मिळाली.

या गुप्त माहितीची महाराष्ट्रवार्ता च्या आपली समस्या टीम ने पडताळणी केली असता त्यांच्या असे ध्यानात आले की वाशी सेक्टर २८ परिसरात, अवांत्रा स्पा/विवा स्पा नामक तारांकित वेलनेस सेंटर असून ते या लॉकडाऊन च्या काळातही बिनधास्तपणे मसाज सेवा पुरवत आहे.

कोविड च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लागू केलेल्या टाळेबंदीत सलून, ब्यूटी पार्लर, स्पा सारख्या अस्थापनांनाही आपले काम बंद ठेवण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. या संदर्भातील अंमलबजावणी करण्याचे काम हे नवी मुंबई पोलिसांचे असून त्यांच्या डोळ्यांदेखत अशा प्रकारे सदर स्पा खुलेआम चालू राहत असेल तर नक्कीच कोणा बड्या पोलीस अधिकाऱ्याचा वरदहस्त संबंधित स्पा मालकावर असणार इतकं नक्की.

लॉकडाऊन दरम्यान पोलिसांची जागोजागी नाकाबंदी-बॅरिकेड्स असून सामान्य नागरिकांना ई-पास शिवाय बाहेर पडण्याची साधी परवानगीही नाही. जर पोलिसांनी अडवलंच आणि पास नसेल तर पोलिसांच्या सतराशेसाठ प्रश्नांची उत्तरं त्यांना द्यावी लागतात. शिवाय दंडुक्याचा प्रसाद जोडीला आहेच. दुचाकीस्वारांच्या मागे तर ट्रॅफिक पोलिसांचा ससेमिरा या काळातही आहेच.

आज जीवनावश्यक गटात मोडणाऱ्या किराणा दुकानांनाही सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत कामकाज चालू ठेवण्याची मुभा असताना सदर स्पा अशा कोणत्या अत्यावश्यक सेवेत मोडतो की त्याचे कामकाज सकाळी ११ ते रात्री ९-१० वाजेपर्यंत चालू ठेवले जाते? शिवाय या स्पा मध्ये काय चालते हे विशेष सांगण्याची गरजही नाही. त्याबाबतही नवी मुंबई पोलीसांची समाजसेवा शाखा हि गांधारीची पट्टी डोळ्यांवर बांधून आहे. मुळात या व इतर स्पा चालक व मालक गँग वर या आधीच IPC 370 व  पिटा (PITA act 3,4,5) कायद्याखाली कठोर कारवाई होणे गरजेचे होते.

नवी मुंबई महानगरपालिकेचे भरारी पथक सध्या मॉर्निंग वॉक साठी फिरणाऱ्या नवी मुंबईकरांवर दंडात्मक कारवाई करत आहे. पण याच भरारी पथकाचे या अत्यावश्यक ‘उद्योगां’कडेच नेमके दुर्लक्ष कसे होतेय याचे उत्तर आता मिळणे गरजेचे आहे.

या साऱ्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांना परिस्थितीचे अजिबात गांभिर्य नाहीए असे मानण्यास नक्कीच जागा आहे. आज कोविड रुग्णांना ऑक्सिजन तसेच रेमडेसीविर व इतर जीवरक्षक औषधांचा तुटवडा जाणवत आहे. आरोग्य यंत्रणाही कोलमडली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांचे संबंध मंत्रिमंडळ कोविड संकटावर नियंत्रण मिळवण्यासाठी दिवसरात्र राबतंय. या अशा काळात शरीरस्पर्शाद्वारे थेट दुसऱ्या व्यक्तीच्या शरीराशी संबंध येणाऱ्या व्यवसायाशी संबंधित स्पा ने खुलेआम नियमांचा भंग करणे ही फार गंभीर बाब असून या प्रकरणी स्पा मालक-चालक व ज्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हे उद्योग चालू आहेत त्यांच्यावर गृहमंत्र्यांनी कठोरात कारवाई करणे गरजेचे आहे.

सुप्रिया मयेकर या महाराष्ट्रवार्ता.कॉम च्या वरिष्ठ पत्रकार असून महिलांविषयक समस्या, महिला अत्याचार/शोषण आदी प्रकरणांत त्यांचे विशेष काम आहे. आपल्याही शहरात अथवा जिल्ह्यात असेच प्रकार चालू असतील तर आपण टीम महाराष्ट्र वार्ता ला news@maharashtravarta.com वर ई-मेल द्वारे व 9372236332 या क्रमांकावर व्हाट्सअप्प द्वारे पुराव्यांसह माहिती पाठवू शकता.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *