Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला ८८५०३०३४६३ वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा

मॉरिशसमध्ये सावरकरांच्या पुतळ्याचे २८ मे रोजी अनावरण;

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण राहणार उपस्थित

मुंबई, दि. २५: स्वातंत्र्यवीर सावरकरांचे तेजस्वी विचार पुढील पिढीत नेण्याचे कार्य अव्याहतपणे सुरु राहावे म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व संमेलन आयोजित केले जाते. यावर्षी हे संमेलन, मॉरिशस येथे स्वा.सावरकरांच्या जयंतीनिमित्त २८ मे २०२३ रोजी संपन्न होणार आहे. मॉरिशसच्या राजधानीत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण होणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण मॉरिशस येथे होणाऱ्या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

मॉरिशसचे राष्ट्रपती पृथ्वीराज सिंह रूपन आणि उपपंतप्रधान लीलादेवी डुकन लच्छुमन यांची उपस्थिती लाभणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण या कार्यक्रमासाठी विशेष आमंत्रित म्हणून उपस्थित राहणार असून महाराष्ट्रातून असंख्य सावरकर भक्त या अपूर्व सोहळ्यासाठी मॉरिशसमध्ये दाखल होणार आहेत.

महाराष्ट्र आणि मॉरिशसमध्ये रस्ते विकास, पायाभूत सुविधा, गुंतवणूक याबाबत मंत्री चव्हाण विविध स्तरांवर भेटीगाठी घेणार असून दोहोंमध्ये परस्पर सहकार्य करण्यावर त्यांचा भर असणार आहे. मॉरिशस म्हणजे चहूबाजूंनी हिंदी महासागराने वेढलेले पाचूचे बेट असून निसर्गाने मुक्त उधळण केलेले पर्यटन स्थळ आहे. सागरी जैव विविधता आणि पारदर्शक स्फटिकासारखे निळेशार पाणी व सुंदर स्वच्छ समुद्रकिनारे अनुभवणे असा सुवर्णयोग जुळून आला आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *