Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

जागतिक स्पर्धेत पुरस्कार मिळविणाऱ्यांना ऑलिंपिकच्या धर्तीवर राज्यामार्फत रोख पुरस्कार देणार – कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक

महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेत चमकदार कामगिरी दाखविणाऱ्या १३२ युवक-युवतींना पारितोषिक वितरण

शांघाय स्पर्धेत पदक मिळवणाऱ्या युवक-युवतींना ऑलिंपिक स्पर्धांच्या धर्तीवर राज्य शासनामार्फत रोख रकमेचे पारितोषिक देऊन गौरविण्यात येईल, असे मंत्री नवाब मलिक यांनी यावेळी जाहीर केले. राज्यस्तरीय स्पर्धेत विजयी ठरलेल्या स्पर्धकांची संपूर्ण तयारी कौशल्य विकास विभागामार्फत करून घेण्यात येईल. त्यांना राज्य शासनामार्फत जागतिक स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने संपूर्ण पाठबळ देण्यात येईल, असे मंत्री मलिक म्हणाले. महाराष्ट्रातील युवक-युवतीमध्ये चांगले टॅलेंट आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील टॅलेंट शोधण्यासाठी आयटीआयबरोबरच विविध उद्योग, पॉलिटेक्निक, अभियांत्रिकी महाविद्यालय आदी ठिकाणी शोध घेऊन कुशल विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला चालना देण्यात येईल, असे ते म्हणाले.

परळ येथील आयएसएमई स्कूल ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड इंटरप्रिनरशिप येथे झालेल्या या कार्यक्रमास कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेन्द्र सिंह कुशवाह, रुस्तमजी ग्रुपचे अध्यक्ष बोमन रुस्तम इराणी, डॉ. इंदू सहानी, वर्ल्ड स्किलचे कंट्री हेड प्रकाश शर्मा, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे सीनियर हेड जयकांत सिंह आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी थ्रीडी डिजिटल गेम आर्ट, ऑटो बॉडी रिपेअर, ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी, बेकरी, ब्युटी थेरपी, कारपेंटिंग, क्लाऊड कॉम्प्युटिंग, सीएनसी मिलींग, काँक्रीट कंस्ट्रक्शन वर्क, कुकिंग, सायबर सिक्युरिटी, इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन टेक्नॉलॉजी, हेअर ड्रेसिंग, होटेल रिसेप्शन, हेल्थ अॅण्ड सोशल केअर अशा विविध क्षेत्रातील कल्पक अशा कौशल्यांचे सादरीकरण केले.

कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यावेळी म्हणाल्या की, आपला देश आता नॉलेज इकॉनॉमीकडे वळत आहे. यासाठी तरुणांमधील कौशल्य विकास खूप महत्त्वाचे आहे. यादृष्टीने कौशल्य विकास विभागामार्फत विविध पावले उचलण्यात येत आहेत. आयटीआयमधील उपकरणाबरोबरच त्यातील अभ्यासक्रमातही उद्योगांच्या गरजांना अनुसरून तसेच बदलत्या तंत्रज्ञानानुसार बदल करण्यात येत आहेत. यापुढील काळातही तरुणांमधील कौशल्यांना चालना देण्यात येईल. त्याचबरोबर आजच्या कौशल्य स्पर्धेत चांगली कामगिरी केलेल्या युवकांनाही संपूर्ण पाठबळ देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेन्द्र सिंह कुशवाह म्हणाले की, यंदा कौशल्य विकास स्पर्धेला तरुणांचा मिळालेला प्रतिसाद पाहता यापुढील काळात त्याला अधिक चालना देण्यात येईल. कौशल्य विकास विभागाने नवनवीन निर्णय घेऊन या क्षेत्रात पुढाकार घेतला आहे. आता कौशल्य विद्यापीठाचीही स्थापना होत आहे. अशा सर्व माध्यमातून राज्यातील युवकांना कौशल्य आणि त्यानंतर शाश्वत रोजगार किंवा स्वयंरोजगार मिळेल, असे त्यांनी सांगितले.

बांधकाम क्षेत्रातील कौशल्यात चमकदार कामगिरी दाखविणाऱ्या दोन विद्यार्थ्यांची  जबाबदारी तथा प्रायोजकत्व आपण स्वीकारीत आहोत, असे बोमन रुस्तम इराणी यांनी यावेळी जाहीर केले.

यावेळी पुढील युवकांना मंत्री मलिक यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

थ्री डी डीजिटल गेम आर्ट- पंकज सिंग, सिद्वार्थ सतिष, यजुर पाटील, ऑटो बॉडी रिपेअर- ओंकार राजेश पाटील, अर्चीत भिमराव पवार, कौस्तुभ घाग, आटोमोबाईल टेक्नॉलॉजी- अदनान कुरेशी, सलमान अन्‍सारी, सक्लेन बशीर वानु, बेकरी- शिवानी सिंग,धीरज के. वासनिक, प्रतिकेश मिलींदराव चितळकर, ब्युटी थेरपी-  दिशा सोनवणे, रिंकल करोत्रा, देवयानी राजकुमार देशमुख, ब्रिकलेयींग- अंकिता अबाजी गांगुर्डे, अश्वजित नागराळे, सिध्देश एस. कदम, कॅबिनेट मेकिंग- राहुल बुलकर, कार पेटींग- साद अन्सारी, मयुरी बी.पवार, आदित्य जोईल, कारपेंटरी-  मिलींद  निकम, ज्ञानेश्वर पांचाळ, उत्सव भोईर, क्लाऊड कॉम्पेटींग- राहुल पवार, यशवंत पाटील, समृद्धी  विश्वनाथ डांगे, सीएनसी  मिलींग- अनिकेत बाळासो खांडाईत, योगेश अनिल खंडागळे,नागेश कद्रे,सीएनसी टर्निग- गौरव संदीप अग्रवाल, प्रतिक गुलाब मेश्राम, स्वस्तिक अभिमन्यू भोकरे,कॉक्रीट कन्स्टक्शन वर्क- सुहासिनी सी. जींद, अतिबऊल्लाह खान इबादुल्लाह खान, सुरज बालाजी काळे, कुकींग- निमिश बिस्वास,  निरजा प्रकाश, सहील सुधीर सावंत, सायबर  सिक्युरिटी- वेद इंगळे, सलमान रफीक शेख, सिमरन बापू जगताप, इलेक्ट्रीकल इन्स्टॉलेशन- योगेश दत्तात्रय राजदेव, हर्षल गजानन शिरभाटे, नेहा दिलीप बुटले, इलेट्रॉनिक्स – संचित भारत जाधव, अकांक्षा राजेश साबळे, अतुल आनंदा फिरके, फॅशन टेक्नॉलॉजी-  दिवीजा, दिक्षा गोयल, अनिल यु. जाधव, फ्लोरेस्ट्री- श्रीराम रोहित कुलकर्णी, वृंदा राहुल पाटील, मृणाली  निखारे, ग्राफीक डिझाईन टेक्नॉलॉजी- नुपुर शाह, सृष्टी  मित्रा, प्रेक्षा राहुल लुंकड, हेअर ड्रेसिंग- यश दिनेश चव्हाण, निरज परमार, माणिक सुबोध घडसे, हेल्थ ॲड सोशल केअर- तमकिन ईशरत शेख, लावण्या अंकुश पुंड, तहमिन फरहात अर्शद खान, हॉटेल रिसेप्शन- डेरेक डिमेलो, मिर्झा कबीर असाद,  दिनेश नानासाहेब नवले, इंडस्ट्रियल कंट्रोल- रितेश एम शिर्के, अजय चव्हाण, अशीष ईश्‍वर भालेराव, इन्फार्मेशन नेटवर्क केबलींग- अमित कुमार, पुजा दशरथ पाटील, भुपेश व्यंकट थेर, आय.टी. नेटवर्क  सिस्टींम ॲडमिनीस्ट्रेटर- विश्वजीत भुरके, प्रियंका सिध्दार्थ टिळक, अविनाश गणेश बोराडे, आय.टी. साफ्टवेअर सोलुशन फॉर बिझनेस- योगेश दत्तु गांगोडे, अकांक्षा देवानंद जाभुळकर, ज्वेलरी- प्रतिक  हिंगेड, उमेश सागवेकर,वृषाली कोठेकर, लॅडस्केप गार्डनिंग- अक्षय एस. जाधव, मेकॅनिकल इंजिनिअरींग कॅड- आनंद फकीरा घोडके, आदित्य श्रीशैल बबन गरे, अब्दुलमुकीद वळसंगकर, मेकॅट्रॉनिक- श्वेतांक भालेकर, अविनाश नवनाथ तौर, दिलीप रामदास सतीमेश्राम, सोमनाथ कोरे,अमित नामदेव बिसेन, निलेश सोनसिंग पवार, मोबाईल रोबोटीक्स- ध्रुव पाटील, रोहीत संजय साठे,आयुषी आरोरा, पुर्वी सिद्धपुरा, पेंटींग ॲड डेकोरेटींग- अश्लेषा भरत इंगवले, गणेश दगडोबा भावे, साक्षी मनोज जाधव, पॅटेसरी ॲड कन्फेक्शनरी- मित्रा राव, अभिषेक भाई पाटील, आयुषी शाह, प्लॅस्टरींग ॲड ड्रायवॉल सिस्टीम- अमितकुमार सिंग, लवकेश पाल,परशुराम चौहान,प्लास्टीक डाय इंजिनिअरींग- रोहित पांडुरंग कोठावडे, सुमित सुभाष काटे,पुष्पक रामकृष्ण कोल्हे, प्लंबीग ॲड  हिटींग- बेलीम मोहम्मद हानिफ, अर्जुन भिमराव मोगरे, शोएब शफी शाह फकीर, प्रींट मेडीया टेक्नॉलॉजी- ओंकार कोकाटे, आदित्य हुगे, विराज रमाकांत भोसले, प्रोटोटाईप मॉडलींग- अनिकेत राजेश शिर्के, दिलीप राजेश सोनवणे, संजोग सुनिल गुरव, रेफ्रीजरेशन ॲड एअर कंडीशनींग-सोहम महादु मुंडे, जीवन संपत चौधरी,मोहमद अब्दुल फैजल महोमदअब्दुल सत्तार, रेस्टॉरंट सर्व्हीस- तेजांगन आर.धोनु, तेजस रविंद्र धोनु, प्राजक्ता एस. भरशंकर,वॅाल फ्लोअर टीलींग- संजीव कुमार सबवाथ, भार्गव उदयकुमार कुलकर्णी, वॉटर टेक्नॉलॉजी- काजल मिश्रा, रुपेश चौधरी, शबा शेख  रियाज, वेब टेक्नॉलॉजी- जुनेद आदेनवाला,रेवांत मेहरा,ऋतीका पाटील. वेल्डींग- शेख इब्राईम अजीझ, आनंद जयवंत महारनवार, रोशन शंकर गायकवाड

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *