Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

महिला दिन विशेष : मासिक पाळी, एक नवा जन्म

महिला दिन विशेष – आरोग्य सदर

मासिक पाळी… एक नवा जन्म

साधारण ६ महिन्यापूर्वीची घटना…
१८ वर्षीय तरुणी चेहऱ्यावर पिंपल्स ची तक्रार घेऊन ओ. पी.डी. मध्ये आली. हिस्टरी घेताना असे लक्षात आले की तिला केवळ पिंपल्स येणे ही एकमेव तक्रार नसून त्यासोबत अति केस गळणे, अस्वस्थता, शांत झोप न येणे इ. अनेक तक्रारी होत्या. आणि ह्या तक्रारीं व्यतिरिक्त मासिक पाळीची अनियमितता हाही एक महत्वाचा प्रॉब्लेम होता. सरतेशेवटी तिच्या आईला बोलावून, मूळ प्रश्न हा त्वचेचा नसून तो पाळीशी निगडित आहे असे निदान करून उपचारांचा श्रीगणेशा केला आणि ती तरुणी पूर्णतः बरी झाली.

सांगायचा मुद्दा हा, की पाळी अनियमित येणे हे वरकरणी जितके सोपे व सरळ दिसते तसे ते नक्कीच नाहीये. आणि समाजात विशेषतः तरुणींमध्ये याची जागरूकता निर्माण करणे अतिशय गरजेचे आहे.
महिलांमध्ये पाळीच्या तक्रारींमध्ये अत्याधिक प्रमाणात अंगावरून जाणे, अतिशय कमी प्रमाणात जाणे आणि पाळी आल्यावर प्रचंड त्रास होणे यांचा समावेश होतो.
आता या सर्वांमागाची कारणे काय असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. जीवनशैलीतील बदल, चुकीच्या खाण्याच्या सवयी, वाढते जंक-फूड खाण्याचे प्रमाण, अवेळी झोप, मोबाईल सारख्या गॅजेट्स चा वाढत वापर, ऐन तारुण्यात वाहणारा एकटेपणा, सततची चिंता या आणि अशा अनेक कारणांचा यात समावेश होतो. तसेच मासिक पाळी आली असता विश्रांती न घेता उलट आपला रोजचाच व्यस्त दिनक्रम चालू ठेवणे याचाही या कारणांमध्ये अंतर्भाव होतो.

या साऱ्यावर योग्य उपाय म्हणजे अर्थातच जीवनशैलीत योग्य बदल करणे, नियमित व्यायाम करणे (सूर्यनमस्कार किंवा इतर योगासने अधिक लाभदायक), रोजच्या आहारामध्ये साजूक तुपाचा वापर, पौष्टिक आहार तसेच योग्य वेळी व पुरेशी झोप घेणे इ.. त्याच जोडीला पाळी आली असता पोटात खूप दुखत असल्यास ती यायच्या आधी ३ दिवस बेंबीत तेल सोडल्यास चांगला आराम मिळतो.
तर अशा पद्धतीने काही पथ्य, आयुर्वेदिक औषधोपचार व पंचकर्म चिकित्सेचा वापर करून आपण या सर्व तक्रारींवर मात करू शकतो हे निश्चित..आणि त्यासाठी आयुर्वेदाची कास धरणे व योग्य वैद्यकीय सल्ला घेणे उचित.

वरील चर्चा केवळ आरंभिक असून या विषयावर सविस्तर चर्चा आपण आगामी लेखांमधून करणारच आहोत.
धन्यवाद !
“सर्वे अ पि सुखीनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः ||”

डॉ. स्नेहल जगदाळे
BAMS Pune
9769210718
snehal.j1311@gmail.com

(Disclaimer: सदर लेखातील मते हि लेखक/लेखिकेची स्वतःची मते आहेत. न्युज पोर्टल फक्त एक माध्यम आहे.)

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *