Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

‘स्वच्छ सर्वेक्षण २०१९’ स्पर्धेत नवी मुंबई ने पटकावला ७ वा क्रमांक, मुंबईची घसरण

‘स्वच्छ सर्वेक्षण २०१९’ स्पर्धेत नवी मुंबई ने पटकावला ७ वा क्रमांक, मुंबईची घसरण

नवी मुंबई प्रतिनिधी : स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत देशभरात घेण्यात आलेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१९’ स्पर्धेमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने ७वा क्रमांक पटकावला आहे. तर मध्यप्रदेशातील इंदोर शहराने प्रथम स्थान प्राप्त केले आहे. तसेच महाराष्ट्रातील शहरांमध्येही नवी मुंबईने अव्वल स्थान पटकावले आहे.

काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे हा पुरस्कार वितरित करण्यात आला. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे नवी मुंबईला लागून असलेले मुंबई शहर गतवर्षीच्या १८ व्या स्थानावरून ४९व्या स्थानी घसरले आहे. ह्या वर्षीचे वैशिष्ट्य असे की ‘स्वच्छ सर्वेक्षण’ स्पर्धेत सर्वधिक ४५ पुरस्कार पटकावून महाराष्ट्राने देशात प्रथम स्थान पटकावले आहे.

नवी मुंबईतील नागरिकांनी ह्या यशाचे संपूर्ण श्रेय नवी मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कामगारांना दिले आहे. वेळच्या वेळी केली जाणारी सफाई, झीरो पेंडंसी वर्क, मलनिःसारणाचे उत्तम व्यवस्थापन, योग्य घनकचरा व्यवस्थापन तसेच लोकसहभाग ही या यशामागची महत्वाची कारणे आहेत.

घणसोली एफ वॉर्ड ने केला जल्लोष
नवी मुंबई महानगरपालिकेच्या ह्या यशात ज्यांचा खारीचा वाटा राहिला त्या घणसोली एफ वॉर्ड विभागातील महापालिका अधिकारी व कर्मचारी वर्गाने त्यांच्या कार्यालयात पेढे वाटून आंनद साजरा केला.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *