
एमआयडीसी तळोजा येथे अंमली पदार्थांचा मोठा साठा नष्ट करण्यात आला
नवी मुंबई, दि. २६: महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) आणि अंमली पदार्थ प्रतिबंधक आयुक्तालय यांनी जप्त केलेला अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थांचा (NDPS) साठा आज महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, तळोजा येथे नष्ट करण्यात आला. केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या निर्देशानुसार, मुंबई सीमाशुल्क विभाग- III अंतर्गत, प्रतिबंधात्मक आयुक्तालयाच्या उच्च स्तरीय अंमली पदार्थ निर्मूलन समितीच्या उपस्थितीत हे अंमली पदार्थ नष्ट करण्याची मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत नष्ट करण्यात आलेल्या कोकेन, हेरॉइन, मेथॅम्फेटामाइन, मारिजुआना (गांजा), मँड्राक्स गोळ्या आणि एमडीएमए या अंमली पदार्थांची एकूण किंमत जवळजवळ १५०० कोटी रुपये होती, अशी माहिती सीमा शुल्क (प्रतिबंधात्मक) विभागाच्या प्रधान आयुक्तांनी दिली.
नष्ट करण्यात आलेले अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ पुढील प्रमाणे:
S.No | Description | Quantity |
1 | Cocaine | 9.035 Kg |
2 | Heroin | 16.633 Kg |
3 | Methamphetamine | 198.1 Kg |
4 | Marijuana (Ganja) | 32.915 Kg |
5 | Mandrax Tablet | 81.91 Kg |
6 | MDMA | 298 Tablets
(134 Gms) |
अंमली पदार्थ नष्ट करण्याची प्रक्रिया मेसर्स मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लि., प्लॉट नं.32, एमआयडीसी, तळोजा, पनवेल, येथे करण्यात आली.