Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

जाणून घ्या दिवंगत मनोहर पर्रिकरांचा जीवन प्रवास

जाणून घ्या दिवंगत मनोहर पर्रिकरांचा जीवन प्रवास

  • संपूर्ण नाव: मनोहर गोपाळकृष्ण प्रभु पर्रीकर
  • जन्म: १३ डिसेंबर १९५५ रोजी गोव्यामधील म्हापसा येथे झाला.
  • शालेय शिक्षण: प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. माध्यमिक शिक्षण मराठीतून झाले.
  • महाविद्यालयी शिक्षण: भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT), मुंबई येथून इ.स. १९७८ साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. (आयआयटी ची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री आहेत.)
  • महाविद्यालयीन विद्यार्थी असल्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत होते.

राजकीय कारकीर्द:

  • १९९४ साली पहिल्यांदा आमदार झाले.
  • ऑक्टोबर २००१ मध्ये पहिल्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले. परंतु थांचे सरकार केवळ दिड वर्षच राहिले.
  • जून २००२ मध्ये मनोहर पर्रीकर पुन्हा एकदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले.
  • त्यांनी २००२- २००५, २०१२-२०१४, आणि २०१७-२०१९ साला पर्यंत गोव्याचे मुख्यमंत्री पद सांभाळले.
  • पर्रीकरांनी ९ नोव्हेंबर २०१४ रोजी केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.
  • पर्रीकर सरंक्षण मंत्री असतानाच उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तनवर सर्जिकल स्ट्राईक केले.
  • २०१७ साली त्यांनी सरंक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिला.
  • १३ मार्च २०१७ मध्ये पुन्हा मनोहर पर्रीकर यांनी गोव्याच्या मुखमंत्रीपदाची शपथ घेतली.
  • २०१८ मध्ये त्यांना स्वादुपिंडाचा कर्करोग झाला.
  • वयाच्या ६३ व्य वर्षी मनोहर पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *