Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने स्वदेशी तंत्रज्ञाननिर्मित क्रूझ क्षेपणास्त्राची ओडिशाच्या किनारपट्टीवर केली यशस्वी उड्डाण चाचणी

डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने स्वदेशी तंत्रज्ञाननिर्मित क्रूझ क्षेपणास्त्राची ओडिशाच्या किनारपट्टीवर केली यशस्वी उड्डाण चाचणी

नवी दिल्ली/चांदीपूर, दि. १८: संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ १८ एप्रिल २०२४ रोजी ओडिशाच्या किनारपट्टीवरील एकात्मिक चाचणी श्रेणी (आय टी आर), चांदीपूर इथून स्वदेशी तंत्रज्ञाननिर्मित क्रूझ क्षेपणास्त्राची (आयटीसीएम) यशस्वी उड्डाण चाचणी केली. चाचणीदरम्यान, सर्व उद्दिष्टे यशस्वीरित्या साध्य करण्यात आली. रडार, इलेक्ट्रो ऑप्टिकल ट्रॅकिंग सिस्टीम (EOTS) आणि आयटीआर द्वारे वेगवेगळ्या ठिकाणी तैनात केलेल्या टेलीमेट्री सारख्या अनेक रेंज सेन्सर्सद्वारे क्षेपणास्त्राच्या कामगिरीचे परीक्षण करण्यात आले,ज्यामुळे उड्डाण मार्गाचा संपूर्ण माग घेता आला.तसेच भारतीय हवाई दलाच्या सुखोई (Su-30-Mk-I)विमानातूनही क्षेपणास्त्राच्या उड्डाणावर लक्ष ठेवण्यात आले.

क्षेपणास्त्राने वे पॉइंट नेव्हिगेशनचा (दिशादर्शन) वापर करून इच्छित मार्गाचा अवलंब केला आणि अत्यंत कमी उंचीवरील समुद्र-स्किमिंग उड्डाणाचे प्रात्यक्षिक केले. या यशस्वी उड्डाण चाचणीने बेंगळुरू येथील गॅस टर्बाइन रिसर्च एस्टॅब्लिशमेंटने,विकसित केलेल्या स्वदेशी प्रणोदन प्रणालीची विश्वसनीय कामगिरीदेखील सिद्ध केली आहे.

अधिक उत्तम आणि विश्वसनीय कामगिरी सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने हे क्षेपणास्त्र अत्याधुनिक वैमानिकी तंत्रे आणि सॉफ्टवेअर यांनी देखील सुसज्ज  केले आहे. बेंगळूरूस्थित डीआरडीओ प्रयोगशाळेतील वैमानिकी विकास आस्थापनेने (एडीई) इतर प्रयोगशाळा तसेच भारतीय उद्योगांच्या योगदानासह हे क्षेपणास्त्र विकसित केले.सदर चाचणीच्या वेळी विविध डीआरडीओ प्रयोगशाळांतील अनेक वरिष्ठ शास्त्रज्ञ तसेच उत्पादन भागीदारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आयटीसीएमच्या यशस्वी उड्डाण-चाचणीसाठी डीआरडीओच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.भारतीय बनावटीच्या प्रॉपल्शनने(प्रणोदन) सक्षम अशा दीर्घ पल्ल्याच्या स्वदेशी सबसोनिक(अवस्वनी) क्रुझ क्षेपणास्त्राचा विकास हा भारतीय संरक्षणविषयक संशोधन आणि विकास कार्यासाठी महत्त्वाचा टप्पा आहे, असे त्यांनी म्हटले आहे. संरक्षण विषयक संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत यांनी आयटीसीएमच्या उड्डाणाच्या यशासाठी डीआरडीओच्या संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *