Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

भारतीय तटरक्षक दलाने कारवारजवळच्या समुद्रात अडकलेल्या मासेमारी नौकेला पुरवले सहाय्य

भारतीय तटरक्षक दलाने कारवारजवळच्या समुद्रात अडकलेल्या मासेमारी नौकेला पुरवले सहाय्य

कारवार, दि. १६: भारतीय तटरक्षक दलाने १६ एप्रिल २०२४ रोजी, कर्नाटक मधील कारवार जवळच्या समुद्रात अंदाजे २१५ सागरी मैल अंतरावर इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे संकटात सापडलेल्या आयएफबी रोझरी या भारतीय मासेमारी नौकेची यशस्वीपणे सुटका केली. आयएफबी रोझरी या नौकेने १३ एप्रिल २०२४ रोजी आपत्कालीन मदतीसाठी दिलेल्या हाकेला भारतीय तटरक्षक दलाच्या सावित्रीबाई फुले या नौकेने त्वरित प्रतिसाद दिला आणि प्रतिकूल हवामानावर मात करत संकटग्रस्त नौकेशी  संपर्क प्रस्थापित केला.

संकटग्रस्त नौकेवर पोहोचल्यावर भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजावरील बोर्डिंग पथकाने नौकेचे इंजिन दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते निष्फळ ठरल्यावर तटरक्षक दल जिल्हा मुख्यालयाच्या (कर्नाटक) आणि मत्स्य विभागाच्या सहकार्याने ही मासेमारी नौका कारवारच्या दिशेने नेण्यात आली. आयएफबी लक्ष्मी नारायण यांच्याकडे ती सुपूर्द करण्यात आली, त्यांनी ती सुरक्षितपणे कारवार बंदरात नेली .

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *