Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

कोणाला मिळालं कोणतं खातं? क्लिक करा आणि जाणून घ्या तपशीलवार

कोणाला मिळालं कोणतं खातं? क्लिक करा आणि जाणून घ्या तपशीलवार

मुंबई: काल राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. या विस्तारात १३ नवीन सदस्यांना सामील करण्यात आले. ज्यात ८ कॅबिनेट व ५ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. नव्या मंत्र्यांना खातेवाटप करताना जुन्या मंत्र्यांपैकी काहींचे खाते बदल करण्यात आले. उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडील शालेय शिक्षण खातं व क्रीडा खातं आशिष शेलार यांना देण्यात आलं आहे. जयकुमार रावल, संभाजी पाटील निलंगेकर, राजकुमार बडोले व सुभाष देशमुख यांचेही खातेबदल करण्यात आले आहेत.

खातेवाटपाचे पूर्ण तपशील पुढीलप्रमाणे

कॅबिनेट मंत्री
राधाकृष्ण विखे पाटील – गृहनिर्माण
जयदत्त क्षीरसागर – रोजगार हमी आणि फलोत्पादन
आशिष शेलार – शालेय शिक्षण आणि क्रीडा व युवक कल्याण
संजय कुटे – कामगार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण
सुरेश खाडे- सामाजिक न्याय
अनिल बोंडे – कृषी
अशोक उईके – आदिवासी विकास
तानाजी सावंत – जलसंधारण
राम शिंदे – पणन व वस्त्रोद्योग
संभाजी पाटील निलंगेकर – अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, कौशल्य विकास, माजी सैनिकांचे कल्याण
जयकुमार रावल – अन्न व औषध प्रशासन, पर्यटन, राजशिष्टाचार
सुभाष देशमुख – सहकार, मदत व पुनर्वसन

राज्यमंत्री
योगेश सागर- नगरविकास
अविनाश महातेकर – सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य
संजय भेगडे- कामगार, पर्यावरण, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन
परिणय फुके – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), वने आणि आदिवासी विकास
अतुल सावे – उद्योग आणि खणीकर्म, अल्पसंख्याक विकास व वक्फ

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *