Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 9372236332 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 9372236332

नेरे-पनवेल येथील महालक्ष्मी नगर च्या प्रवेशद्वाराला अडचणीच्या ठरणार्‍या अनधिकृत बांधकामाविरोधात सिडकोकडे तक्रार दाखल

विकासक अनिश मेहता Anish Mehta विरोधात ‘एमआरटीपी’ च्या कलम 53(1) नुसार कारवाई करण्याची सामाजिक कार्यकर्ते अतुल शिलवंत यांची सिडको कडे पत्राद्वारे मागणी

पनवेल, दि. २५: दिनांक १६ जुन २०२३ रोजी पनवेल Panvel तालुक्यातील नेरे Nere ग्रामपंचायत हद्दीतील महालक्ष्मी नगर Mahalxmi Nagar या निवासी संकुलाच्या प्रवेश द्वाराजवळील शॉपिंग मॉल च्या अनधिकृत बांधकामासंबंधी वरिष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते अतुल शिलवंत यांनी सिडको चे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांच्याकडे लेखी पत्राद्वारे तक्रार दाखल केली. जवळपास ८०० घरांच्या या अवाढव्य निवासी संकुलात प्रवेश करण्यासाठी मोजून ९ फूट रुंदीचा रस्ता आहे. विकासक अनिश मेहता यांच्या महालक्ष्मी डेव्हलपर्स Mahalaxmi Developers ने प्रवेशद्वाराला लागून असलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्स चे बांधकाम मूळ मंजूर आराखड्यानुसार न केल्यामुळे येथील नागरिकांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत. या संबंधी महालक्ष्मी नगर येथील काही सजग रहिवाश्यांनी सामाजिक कार्यकर्ते अतुल शिलवंत Atul Shilwant यांना या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली होती. याच पार्श्वभूमीवर शिलवंत यांनी सदर बांधकामावर कारवाई करण्याच्या हेतूने सिडको CIDCO NAINA प्रशासनासोबत पत्रव्यवहार करण्यास सुरुवात केली.

या आधी सन २०२० साली महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ने बातमी प्रसारित करत या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, कोविड काळात सिडको प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. परंतु आता लेखी तक्रार दाखल झाल्यामुळे प्रशासनाला नक्कीच याची दखल घ्यावी लागेल. या संबंधी माहिती देताना सामाजिक कार्यकर्ते अतुल शिलवंत म्हणाले की, “गेल्या काही काळापासून महालक्ष्मी नगर व या डेव्हलपर्स शी संबंधित अनेक तक्रारी माझ्याकडे येत होत्या. अखेर संबंधित कागदपत्रांचा अभ्यास केल्यावर विकासक अनिश मेहता याने केलेला गोलमाल समोर आला. अंदाजे ३५-४० एकर वर पसरलेल्या या निवासी संकुलात जर भविष्यात काही नैसर्गिक आपत्ती अथवा आग लागणे असे काही बिकट प्रसंग उद्भवले तर अशा वेळी अग्निशमन दलाच्या वाहनांना एवढ्या छोट्या वाटेतुन आत प्रवेश करणे अशक्य आहे. अशा वेळी मोठी जीवित हानी होण्याची शक्यता जास्त आहे.” पुढे शिलवंत म्हणाले की, “मी स्वतः या ठिकाणी येऊन पाहणी केली असता जाणवले की संकुलात प्रवेश करण्यासाठी असलेल्या या मुख्य प्रवेशद्वारातून एकावेळी एकाच चार चाकी वाहनाला प्रवेश करणे शक्य आहे. शेवटी रस्ता अडवणार्‍या महालक्ष्मी नगर शॉपिंग मॉल शी संबंधीत या अवैध बांधकामाविरोधात १६ जून २०२३ रोजी आम्ही सिडको प्रशासनाकडे महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर नियोजन अधिनियम(MRTP) च्या कलम 53(1) नुसार तात्काळ कारवाई करण्यासंबंधी लेखी पत्र दिले.”
महालक्ष्मी शॉपिंग कॉम्प्लेक्स जवळ या विकासकाने कलेक्टर मंजूर प्लान प्रमाणे बांधकाम न करता याच जागेच्या बाजूला असलेल्या गवते नामक जमीन मालकाची जमीन विकत घेण्याचे फक्त खोटे आश्वासन देत काही वर्षे तिचा नुसताच वापर केला. अखेर ७ वर्षांपूर्वी गवते यांनी कोर्टाचं दार ठोठावत आपली जमीन ताब्यात घेत ती खणून त्याला कुंपण घातलं. कायद्याप्रमाणे ती त्यांची स्वतःची संपत्ती असून त्या ठिकाणी ते काहीही करण्यास मोकळे आहेत. मुळात एवढ्या मोठ्या संकुलात प्रवेश करण्यासाठी रस्ता छोटा असल्याच्या बाबीकडे सिडको नैना प्राधिकरणाने स्वतःहून लक्ष घालत विकासकाने केलेले अवैध बांधकाम पाडत रस्ता मंजूर आराखड्याप्रमाणे मोकळा करून देणे आवश्यक होते. गेली अनेक वर्षे या विभागातील नागरिकांच्या समस्या मांडताना महाराष्ट्र वार्ता टीमच्या नजरेत प्रशासनाचा मुडदाडपणा प्रकर्षाने जाणवला. महालक्ष्मी नगर संकुलातील रस्त्याची ही समस्या मार्गी लागली तर येथील घरांचे दर नक्कीच २५ ते ३० टक्क्यांनी वधारतील यात शंकाच नाही. बाकी या संकुलातील घर मालकांना विकासकाने दिलेली स्विमिंग पूल सह इतर आश्वासने हवेतच विरली आहेत. नियमाप्रमाणे महालक्ष्मी नगर डेव्हलपर्स ने येथील घर मालकांना कन्व्हेयन्स डीड करून देणे अपेक्षित होते. परंतु त्याने या संबंधी अद्याप कोणतेही पाऊल उचललेले नाही. विकासक अनिश मेहता याने जो निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे त्याची फळं महालक्ष्मी नगर सोबत नेरे ग्रामस्थांना ही भोगावी लागत आहेत.
प्रदूषण, अनधिकृत बांधकाम, विकासकाकडून फसवणूक, सरकारी दिरंगाई व आर्थिक घोटाळे संदर्भातील आपल्या काही तक्रारी असतील तर महाराष्ट्र वार्ता डॉट कॉम च्या ‘आपली समस्या’ टीम ला आपण 88503 03463 वर व्हाट्सअप्प आणि news@maharashtravarta.com वर ईमेल द्वारे पुराव्यानिशी माहिती देऊ शकता.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *