Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“शेतकऱ्यांना ताकद देवून महाराष्ट्र सुजलाम् -सुफलाम् करणार” – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

“शेतकऱ्यांना ताकद देवून महाराष्ट्र सुजलाम् -सुफलाम् करणार” – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

“कृषिक 2020” प्रदर्शनाचे शानदार उद्घाटन
पुणे: शेतकऱ्यांचे शेतीविषयीचे पारंपरिक ज्ञान अचंबित करणारे आहे. त्यांच्या ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्न केला जाईल.  राज्यातील शेतकऱ्यांना ताकद देऊन महाराष्ट्राला सुजलाम्-सुफलाम् करणार असल्याचा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला.
शारदानगर (माळेगाव) येथील कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने आयोजित “कृषिक 2020” प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालेत्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेकृषिक प्रदर्शन हे प्रात्यक्षिकासह असणारे सर्वोत्तम प्रदर्शन आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून अभिमान वाटावे असे काम झाले आहे. माळरानावर नंदनवन फुलले आहे. जग झपाट्याने बदलत असून विविध क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित होत आहे. आपला देश हा शेतीप्रधान असून शेती हाच आपला मुख्य कणा आहे. देशाची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने अनेक नैसर्गिक संसाधनांवर ताण आला आहे. सर्वांना जगविण्याचे काम शेतकरी करतो.
 
मुख्यमंत्री ठाकरे म्हणालेभविष्याचा विचार करून आपल्याला पाण्याचे योग्य नियोजन करावे लागेल. हे नियोजन झाल्यास शेती समृद्ध होईल. आता मातीविना शेती आणि हवेवरील शेतीचे यशस्वी प्रयोग झाले आहेत. त्याचप्रमाणे व्हर्टिकल शेतीचेही प्रयोग सुरु आहेत. महाराष्ट्राच्या भूमीत अनेक चमत्कार होत असतातशेतीच्या नवनवीन प्रयोगांचेही चमत्कार याच भूमीत होतील. महाराष्ट्राचा शेतकरी देशातील शेतकऱ्यांना नक्की दिशा दाखवेलअसा विश्वास व्यक्त करत शेतीसाठी आवश्यक असणारी प्रत्येक गोष्ट शासन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
यावेळी खासदार शरद पवार म्हणाले, “कृषिक”च्या माध्यमातून दरवर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतात. जगाची शेती बदलत आहे. त्यामुळे उत्पादकता वाढत आहे. या क्षेत्रात सातत्याने सुधारणाबदल आणि संशोधन करणे आवश्यक आहे. देशात उपयुक्त संशोधनाला चालना देण्याची आवश्यकता आहे.
शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी प्रोत्साहित करण्याची भूमिका राज्य शासन नक्की घेईलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
 
कृषी प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रदर्शनाची पाहणी केली. तेथील विविध शास्त्रज्ञ,तंत्रज्ञ आणि प्रगतशील शेतकरी यांच्याशी संवाद साधला.
ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वाटचाली विषयीची चित्रफीत यावेळी दाखविण्यात आली. सुहास जोशी आणि डॉ. मई नाऊ यांनी “दुष्काळ निवारण कृती आराखडा” या विषयावरील शास्त्रीय संकल्पनेचे सादरीकरण केले. यावेळी डॅन अलुफ यांचे भाषण झाले. सिनेअभिनेते आमीर खान यांच्याशी यावेळी संवाद साधण्यात आला. प्रास्ताविकात राजेंद्र पवार यांनी ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वाटचालीची माहिती दिली.
यावेळी माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवारउपमुख्यमंत्री अजित पवारकृषिमंत्री दादाजी भुसेपशु संवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री सुनील केदारकृषी राज्यमंत्री विश्वजीत कदमखासदार सुप्रिया सुळेआमदार रोहित पवारधीरज देशमुखइस्राईलचे आंतरराष्ट्रीय धोरणकर्ते सल्लागार दूत डॅन अलुफसिनेअभिनेते आमीर खानजिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरेपंचायत समितीच्या सभापती नीता बारवकरबारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरेॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवारडॉ. सुहास जोशी उपस्थित होते.
या कार्यक्रमाला देशभरातील कृषी क्षेत्रातील शास्त्रज्ञतंत्रज्ञविविध विद्यापीठांचे कुलगुरूविद्यार्थी प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *