
माजी मंत्री अर्जुन खोतकर यांची जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रशासकपदी निवड
जालना, दि. २५: जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रशासकपदी शिवसेना शिंदे गटाचे उपनेते, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची, तर उपमुख्य प्रशासकपदी भाजपाचे विधानसभा प्रभारी भास्कर दानवे यांची नियुक्ती झाली आहे. या समितीत अन्य १४ जणांचाही समावेश आहे. या समितीची नियुक्ती महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती अधिनियम २०१७ मधील तरतुदीनुसार करण्यात आली असून ती शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत कायम असणार आहे. जालना बाजार समितीच्या वैधतेची मुदत जून २०२२ मध्येच संपली होती. त्यानंतर या समितीचं विभाजन करून बदनापूर बाजार समिती नेमण्यात आली होती.
Source – AIR