Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

जाणून घ्या व्यायाम का, कधी, कसा आणि कोणी करावा! का व्यायाम करताना प्रोटीन ड्रिंक पिऊ नये?

जाणून घ्या व्यायाम का, कधी, कसा आणि कोणी करावा! का व्यायाम करताना प्रोटीन ड्रिंक पिऊ नये?

आयुर्वेद कुतूहल

आजकाल तरुणाई मध्ये व्यायामाचे वेड आहे. ज्याला त्याला muscle develope करायच्या आहेत. त्यासाठी पाहिजे ते diet, पाहिजे तेवढा व्यायाम करताना हे योग्य आहे की नाही ह्याचं देखील भान लोकांना नाही.
व्यायाम आयुर्वेदाने देखील प्रशस्त मानला आहे दिनचर्येत त्याचा समावेश आहे परंतु त्याचे योग्य प्रकारे नियम पाळूनच तो देहाला सुदृढ बनवू शकतो.

व्यायामाची परिभाषा –
शरीर चेष्टा या चेष्टा स्थैर्यार्था बलवर्धिनी ।
देह व्यायाम संख्याता मात्राया तां समाचारेत ।।

शरीराच्या ज्या क्रियेमुळे शरीराला स्थिरता आणि बल मिळते त्यास व्यायाम म्हणतात, व्यायाम हा मात्रा पूर्वकच करावा.

व्यायामाचे लाभ –
* शरीराचे सम्यक पोषण होते.
* शरीराचा योग्य विकास होतो.
* भूक चांगली लागते व पाचन सुधारते.
* शरीरातील मेद व कफाचा संचय कमी होतो.
* शरीर दृढ व स्थिर होते.
* शरीराला हलके पणा जाणवतो.
* कष्ट सहन करण्याची क्षमता वाढते.

ऋतु अनुसार व्यायाम –
* शीत ऋतु व वसंत ऋतू मध्ये व्यायाम अर्धशक्ती करावा.
(नोव्हेंबर ते मार्च )
* शीत ऋतूत मनुष्याची शाररीक क्षमता अधिक असते तसेच वसंत ऋतू मध्ये कफाचा प्रकोप असतो म्हणून अर्धशक्ती व्यायाम सांगितला आहे.
* इतर ऋतूंमध्ये बल शीत ऋतूंच्या तुलनेत कमी असते म्हणून अर्धशक्ती पेक्षा कमी व्यायाम करावा.
* उन्हाळा व पावसाळ्यात बल सर्वात कमी असते म्हणून ह्या ऋतूंच्या ऋतुचर्येत व्यायामाचा निषेध आहे.
परंतु मेदस्वी, सतत स्निग्ध आहार घेणारे हे अपवाद आहेत त्यांनी अर्धशक्ती पेक्षा कमी व्यायाम करावा.

अर्धशक्ती लक्षण –
हृदी स्थानस्थितो वायु: यदा वक्त्र प्रपद्यते ।।
साध्या भाषेत सांगायचे तर धाप लागून जेव्हा नाकाऐवजी तोंडावाटे श्वास निघतो त्यास अर्ध शक्ती म्हणतात.
* हि प्रत्येक व्यक्ती साठी भिन्न असते. आपण कालांतराने सतत अभ्यासाने ह्या शक्तीत वाढ करू शकतो. ह्यालाच stamina development असे म्हणतात.
* व्यायाम करताना आपले वय, बल, शरीर, देश, काल, आहार ह्या सर्वांचा विचार करून व्यायाम करावा.

*अति व्यायामाने हानी –
अतिव्ययामामुळे छातीत दुखणे, जखम होणे, क्षय, क्षिणता, दुर्बलता, कृशता, चक्कर येणे, श्वास रोग,नाकातून- तोंडातून रक्त येणे इ. व्याधी उदभवू शकतात.

* व्यायाम अयोग्य व्यक्ती – अधिक परिश्रम करणारे, ओझी उचलणारे, क्षय व्याधी पीडित, दुर्बल ,सतत उपवास करणारे( निराहारी) , रुक्ष आहार घेणारे, नुकतेच जेवण केलेले, अजीर्ण रोगी, बालके, वृद्ध, सूतिका स्त्रिया, मासिक धर्म चालू असताना.
* व्यायाम हा दिनचर्येचा भाग आहे परंतु त्याचा एक विशिष्ट काळ आहे मेद व कफाचा क्षय करताना वात व पित्त वाढू नये हा समतोल राखण्यासाठी व्यायाम नेहमी सकाळीच करावा( सुर्योदया आधी) रात्री व्यायाम आयुर्वेदाला मान्य नाही.
* अजीर्ण म्हणजे अन्न नीट न पचणे, ह्यावेळी तसेच नुकतेच जेवल्यावर व्यायाम करणे हे आयुर्वेदानुसार त्वचा रोग व आम वाताचे कारण आहे म्हणून व्यायाम करताना मध्ये मध्ये पिण्यात येणारे प्रोटीन ड्रिंक अथवा व्यायामाआधी घेतलेले अन्न, फळे अथवा प्रोटीन ड्रिंक हे चुकीचे आहे कारण अन्न पचण्याआधी कोणता हि व्यायाम करू नये. त्यात प्रोटीन पचायला जड असतात.
* muscle buildup साठी घेतला जाणारा अधिक प्रमाणात प्रोटीन युक्त आहार अथवा प्रोटीन ड्रिंक हे शरीराला घातकच आहेत. ह्याचे अजीर्ण होतेच, जर ते पोटाच्या मार्फत बाहेर नाही आले तर दुसरा मार्ग शोधते. शरीरावर निर्माण होणाऱ्या मेदाच्या गाठी( lypoma) ह्याचेच प्रतीक आहे. आणि पुढे जाऊन ते अधिक घातक ठरू शकते. अशावेळी योग्य सल्ला घ्यावा.
* पाणी हृदयाची गती व शरीराच तापमान स्थिर असताना प्यावे व व्यायाम करताना दोन्ही वाढतात आणि बरेच जण व्यायाम करताना पाणी पितात हे सर्वथा अयोग्य आहे. ह्यामुळे हृदय रोगासारखे रोगही उद्भवू शकतात.
* व्यायाम करताना तो नैसर्गिक तापमानात करावा, अन्यथा त्याचा उपयोग होत नाही. घाम आल्यावर A. C. पुढे उभे राहणे योग्य नाही. शरीराला घाम यावा म्हणूनच व्यायाम केला जातो.
* आयुर्वेदात बालकांना व्यायाम निषिद्ध आहे ,ह्यात धावणे खेळणे हे येत नाही. वजन उचलणे, कुस्ती इ प्रकारचे व्यायाम येतात. बालक हि संज्ञा १६ वर्षा पर्यंत दिली आहे.
* रात्री जागरण ( रात्र पाळी) झाली असल्यास सहसा व्यायाम करू नये. ह्याचा अतिरेक झाल्यास निद्रा नाश यांसारखे रोग होऊ शकतात.
* सूतिका काळात व स्त्री मासिक धर्म चालू असताना वाताचे आधिक्य असते म्हणूनच ह्या काळात व्यायाम करू नये, ह्या काळात स्त्री ने सामान्य काम,ओझी उचलणे व अधिक खेळणे ह्या गोष्टी देखील करू नयेत.

व्यायाम नियमाने केला असता शरीर दृढ करतो व नियमपूर्वक न केल्यास शरीर निकामी करतो म्हणून व्यायाम करावा पण नियमानेच.
भेटूया पुढील लेखात तोपर्यंत
आयुष्य जगा आयुर्वेदा संगे ।

वैद्य शार्दुल चव्हाण
एम. डी. आयुर्वेद
9987925720
shardulchavan88@gmail.com

जगदंब The Ayurvedic World

वाचा, चटकन लाईक आणि शेअर करा

(Disclaimer: सदर लेखातील मते हि लेखक/लेखिकेची स्वतःची मते आहेत. न्युज पोर्टल फक्त एक माध्यम आहे.)

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *