Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

गुटखा-पान मसाला व्यवसायात असलेल्यांची आता खैर नाही

गुटखाबंदी संदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

अन्न व औषध प्रशासनाला यश

मुंबई: अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदी सोबत फक्त भारतीय दंड संहितेचे कलम 188 लागू होतेअसा निर्णय उच्च न्यायालयखंडपीठ औरंगाबाद यांनी दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी स्वतः पुढाकार घेऊन पाठपुरावा केला व राज्य सरकारतर्फे अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन सोबतच भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ व त्यासोबत कलम ३२८ हे आरोपीविरुद्ध लावणे आवश्यक आहेअशी स्वतंत्र अभिमत याचिका सर्वोच्च न्यायालयात नोव्हेंबर २०२० मध्ये दाखल केलीत्यावर सर्वोच्च न्यायालयानेऔरंगाबाद खंडपीठाच्या न्यायालयाच्या आदेशाला दि. ७ जानेवारी २०२१ रोजी स्थगिती दिलेली आहे.

महाराष्ट्र राज्यातसार्वजनिक आरोग्याच्या हेतूने व जनहित लक्षात घेता गुटखापानमसालासुगंधित तंबाखूसुगंधित सुपारी व इतर तत्सम पदार्थावर २०१२ पासून अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदींच्या अधीन राहून अन्नसुरक्षा आयुक्त यांनी बंदी घातलेली आहे. प्रतिबंधित अन्नपदार्थाच्या सेवन करण्यामुळे मुख कर्करोग तसेच इतर गंभीर स्वरूपाच्या शारीरिक व्याधी निर्माण होतात हे वैज्ञानिक संशोधनाअंती सिद्ध झालेले आहे. त्या अनुषंगाने विविध संशोधन झालेले असूनत्यांनी प्रसिद्ध केलेल्या रिसर्च पेपरमध्ये यांचा विस्तृत प्रमाणावर उल्लेख केलेला आहे. या सर्व बाबींचा विचार करता महाराष्ट्रात गुटखापान मसालासुगंधित तंबाखूसुगंधित सुपारी व इतर तत्सम पदार्थांच्या उत्पादन/ वाहतूक/ विक्री/ साठा/ वितरण यावर बंदी घालण्यात आलेली आहे. या बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ नियम व नियमन २०११ त्याचबरोबर भारतीय दंड संहिता कलम १८८ व ३२८ यांचा समावेश होऊन आरोपीविरुद्ध संबंधित न्यायालयामध्ये फिर्याद दाखल करण्यात येत होती. मात्र या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध मराठवाड्यातील औरंगाबादबीडउस्मानाबादलातूर, नांदेडपरभणी तसेच नगर व धुळे जिल्ह्यातील काही व्यापाऱ्यांनी त्यांच्याविरूद्ध लावण्यात येणाऱ्या भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ व ३२८ च्या संदर्भात उच्च न्यायालयखंडपीठ औरंगाबाद येथे रिट याचिका दाखल केल्या होत्या. त्यांचा एकत्रित निकाल मार्च २०१६ मध्ये घोषित झाला. उच्च न्यायालयखंडपीठ औरंगाबाद यांनी अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदी याच फक्त उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांवर लागू होतात असे नमूद केले.

या निकालाच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र अभिमत याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावर सुनावणी होऊन अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदी बरोबर भारतीय दंड संहितेच्या तरतुदी लागू होतात असा निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने देऊनसर्व तेरा याचिका रिमांड बॅक केल्या व त्याची पुन्हा सुनावणी होऊन उच्च न्यायालयखंडपीठ औरंगाबाद यांनी १५ ऑक्टोबर २०२० रोजी निकाल घोषित केला कीअन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदी सोबत फक्त भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ लागू होते. तथापि न्यायालयाच्या या निर्णयाच्या विरुद्ध डॉ. शिंगणे यांनी स्वतः पुढाकार घेऊन व पाठपुरावा केला व राज्य सरकार तर्फे अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन सोबतच भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ व त्यासोबत कलम ३२८ हे आरोपीविरुद्ध लावणे आवश्यक आहे असे सर्वोच्च न्यायालयात सरकारी अभियोक्ता चिटणीसपाटील यांच्या मार्फत स्वतंत्र अभिमत याचिका नोव्हेंबर २०२० मध्ये दाखल केल्यात्यावर मा. सर्वोच्च न्यायालयानेऔरंगाबाद खंडपीठाच्या न्यायालयाच्या आदेशाला दिनांक ७ जानेवारी २०२१ रोजी स्थगिती दिलेली आहे.

ही कार्यवाही अन्न सुरक्षा आयुक्त अभिमन्यू काळे तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय त्याचबरोबर विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव, विधी व न्याय विभागाचे औरंगाबादचे उपसचिव चव्हाणसहसचिव कदम, सरकारी अभियोक्ता यावलकर (खंडपीठऔरंगाबाद) सहआयुक्त आढावयांचे मार्गदर्शनाखाली सह आयुक्त औरंगाबाद विभाग वंजारीसहाय्यक आयुक्त नांदेड, बोराळकरअन्न सुरक्षा अधिकारी औरंगाबाद फरीद सिद्दिकी यांनी पूर्ण केली.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *