Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

स्त्रीत्व: ‘मुली’ वयात येताना…

स्त्रीत्व: ‘मुली’ वयात येताना…

मागील लेखात आपण पाळी येणे व त्यासंबंधी शास्त्रीय कारणे जाणली. घाबरलेली, बावरलेली आपली रिमा आता आत्मविश्वासाने परिपूर्ण आहे. म्हणूनच दहावीची परीक्षा संपल्यानंतर लगेच माथेरान ट्रेक चे नियोजन ती करत आहे.
कधीही मुलांसोबत ट्रेकला न गेलेला त्यांचा group ह्या वर्षी काही selected वर्ग मित्रांना घेऊन जायच्या तयारीत आहे.
” अगं किती वेळा मोबाईल हातात घेशील?”
आईची बडबड चालू असतानाच रिमा चिडते, “काय गं आई? आताच तर परीक्षेच्या tension मधून बाहेर आले आणि ट्रेक च्या planning साठीच अविनाश शी chatting करत आहे.”
आई व मुलगी यांच्यातील मत मतांतरे ही ती वयात येतानाचा सर्वात महत्वाचा टप्पा, यालाच आपण ‘hormonal changes’ असं नाव देतो. आता हेच पाहा, आज पर्यंत वर्गात किती मुले आहेत याची कल्पनाही नसलेली आपली नायिका चक्क त्यांना ट्रेक ला न्यायचे planning करत आहे. याला जबाबदार तिच्या वाढत्या वयात मुलांविषयी वाढते आकर्षण हे आहे. मुलांशी मैत्री करावीशी वाटणे.हाही वाढत्या बदलांचाच एक भाग आहे. जे अजिबात वावगं नाही.
अजून खोलात जाऊन विचार करायचे म्हटले तर काल स्कर्ट ब्लाऊज घालणाऱ्या रिमा ला आज जीन्स आणि टाॅप आवडू लागले. सगळ्यांपेक्षा मी वेगळी दिसावी यासाठी तिचे प्रयत्न सुरू झाले, सतत चेहरा पाहून मी कशी दिसते याबद्दल ती जागरूक राहू लागली, नटणे मुरडणे, fashionable कपडे घालणे नित्याचे झाले, जे या वयात normal आहे.
उंची झपाटय़ाने वाढणे, काखेत व जांघेत केस वाढणे, स्तनांची-नितंबांची वाढ अधिक चांगल्या प्रकारे होणे, अशा प्रकारच्या बदलांमुळे मुलीचे रूप अधिक खुलून दिसायला लागते. ती आत्मविश्वासी, धाडसी, मनाला हवे तसे वागणारी आणि जिद्दी बनते.
थोडक्यात
‘आज मे उपर,आसमा नीचे,
आज मे आगे, जमाना है पीछे.’
अशी काहीशी तिची स्थिती असते.तिच्या भविष्यात नवी भरारी घेण्याचे, स्वप्नांना नवी दिशा देण्याचे काम याच वयात सुरू होते. यात आई वडीलांनी तिला साथ देणे हे ही तितकेच गरजेचे…
आयुर्वेदाप्रमाणे पहिली पाळी येते त्या दरम्यान पित्ताधिक्याचा काळ असतो. आणि वरील सर्व लक्षणे त्याचीच आहेत. वरील सर्व कार्ये प्राकृत पित्ताची आहेत.आणि हेच प्राकृत पित्त पाळी नियमित यावी म्हणून सज्ज असते.
चला तर मग, भेटूया पुढील भागात यापुढील चर्चेसाठी
ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी….

‘संकोचाचा पडदा दूर सारूया
विज्ञानाचा प्रकाश सर्वञ पसरवूया’

धन्यवाद.

“सर्वे अपि सुखाने सन्तु
सर्वे सन्तु निरामयः”

Dr Snehal Jagdale
BAMS
9769210718
‘Ayur Care clinic and Panchakarma Center’,
A1 mohatta nagar CHS, behind St Joseph school, Vikhroli West.

लेख आवडल्यास लाईक l शेअर l कंमेंट करा

(Disclaimer: सदर लेखातील मते हि लेखक/लेखिकेची स्वतःची मते आहेत. न्युज पोर्टल फक्त एक माध्यम आहे. आम्ही कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर विषयाला बांधील नाही)

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *