Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

तुम्हाला ठाऊक आहे, मातृदिन का साजरा केला जातो? नाही मग जरूर वाचा

तुम्हाला ठाऊक आहे, मातृदिन का साजरा केला जातो? नाही मग जरूर वाचा

‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ स्वामी विवेकानंदांचे हे अमर वाक्य. आज या वाक्याची सगळेच जण जरा जास्तच आठवण काढत आहेत कारण आज जागतिक मातृदिन आहे. आज आपण सर्वच फेसबुक, व्हाट्सअप्प वर आपल्या आईबरोबरचे फोटोस स्टेटस-पोस्ट टाकून हा दिन साजरा करत आहोत. पण आपल्या पैकी किती जणांना ठाऊक आहे की हा दिन कधीपासून आणि का साजरा केला जाऊ लागला? या प्रश्नाचं उत्तर जर तुमच्यापाशी नसेल तर आम्ही आपल्याला त्याची सविस्तर माहिती देत आहोत.

‘मातृदिन’ दर वर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा केला जातो. आईला आनंद व सन्मान देण्यात पूर्ण जीवनही कमी पडावं. तरीही जगात आईच्या सन्मानार्थ मातृदिन साजरा केला जातो. मातृदिवस जगातल्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो, परंतु मे महिन्याच्या दुसऱ्या रविवार या दिवसाला अधिक महत्व दिलं जातं. तसं पाहिलं तर भारताच्या काही भागात १९ ऑगस्ट लाही मातृदिन साजरा केला जातो. पण अधिक मान्यता अमेरिकेच्या मातृदिनाला आहे. अमेरिकेत हा दिवस इतका महत्वाचा आहे की तो तिथे एका उत्सवा सारखा साजरा केला जातो.

हा आहे इतिहास

मातृदिनाचा इतिहास शतको जुना व प्राचीन आहे. ‘युनान’ प्रांतात ‘वसंत ऋतू’च्या अगमनाला परमेश्वराच्या आईला सन्मानित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जायचा. १६व्या शतकात इंग्लंड मधीन ख्रिस्ती समाज ‘येशू ख्रिस्ताची’ आई ‘मदर मेरी’ ला नमन करण्यासाठी हा दिन साजरा केला जाऊ लागला. ‘मातृदिन’ साजरा करण्यामागचे मूळ कारण समस्त मातांना सन्मान देणं आणि बाळाच्या संगोपन करण्याच्या महान भूमिकेला नमन करणं हे आहे.
जगभरात मातृदिनाला लोकप्रिय करण्याचं व हा दिवस साजरा केला जाण्याचं श्रेय अमेरिकेच्या ‘एना एम. जारविस’ यांना जातं। एना चा जन्म अमेरिकेच्या पश्चिम व्हर्जिनिया प्रांतात झाला. त्यांची आई जवळपास दोन दशकांपर्यंत एका चर्च मध्ये संडे स्कूल टीचर म्हणून कार्यरत होती. एके दिवशी त्यांची आई संडे स्कूल वर्गादरम्यान बायबल या धर्मग्रंथामधील एका परिच्छेदा संदर्भात सांगत होती. त्यावेळी जारविस १२ वर्षाच्या होत्या. हा वर्ग चालू असताना त्यांच्या आईने एक इच्छा प्रकट केली. त्यांनी आपल्या आईला बोलताना ऐकलं की एक दिवस येईल ज्या दिवशी माता व मातृत्वाला साजरं केलं जाईल. त्या काळी फक्त पुरुषांना समर्पित असे दिवस साजरे केले जायचे.

आई च्या निधनांनंतर आलं एक वळण

एना च्या आईचं निधन झाल्यावर २ वर्षांनंतर, एना आणि त्यांच्या मैत्रिणींनी एक अभियान सुरू केलं. त्यांनी मातृदिनाच्या राष्ट्रीय सुट्टीसाठी लोकांचं समर्थन मिळवलं. एना यांना पूर्ण खात्री होती की हा दिन साजरा केला गेला तर आई आणि तिचं संपूर्ण कुटुंब यांच्यामधील संबंध सुदृढ होतील. ८ मे, १९१४ रोजी अमेरिकेच्या संसदेत मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी हा दिवस मातृदिन म्हणून घोषित केला.

आवडल्यास फेसबुक पेज व लेख लाईक l शेअर l कमेंट करा

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *