राष्ट्रवादीचे आ. भास्कर जाधव यांची शिवसेनेत घरवापसी?; मातोश्री भेटीनंतर चर्चांना उधाण
मुंबई/रत्नागिरी: राष्ट्रवादीतून आऊट गोइंग चा सिलसिला काही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. बीड येथील आमदार जयदत्त क्षीरसागर, मुंबईतील सचिन आहेर, चित्रा वाघ यांच्या नंतर आता पूर्वाश्रमीचे शिवसैनिक राहिलेले रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कारण काहीवेळापूर्वी त्यांनी मातोश्रीवर जाऊ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. जवळपास एक तास दोघांमध्ये चर्चा झाली.
जर आ. भास्कर जाधव यांची शिवसेनेत घरवापसी झाली तर राष्ट्रवादीसाठी कोकणात फार मोठी धोक्याची घंटा असू शकेल. याआधी रत्नागिरी जिल्हयात ५ वर्षांपूर्वी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार उदय सामंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. आणि आता जर आ. भास्कर जाधव यांनी सेनेत प्रवेश केला तर रत्नागिरीतून राष्ट्रवादी पूर्णपणे हद्दपार होऊन जाईल.
