Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

‘विकसित भारत संकल्प यात्रा’ उपक्रमाची बेलापूरमध्ये यशस्वी सांगता २५ हजाराहून अधिक नवी मुंबईकरांनी घेतला शासकिय योजनांचा लाभ

‘विकसित भारत संकल्प यात्रा’ उपक्रमाची बेलापूरमध्ये यशस्वी सांगता २५ हजाराहून अधिक नवी मुंबईकरांनी घेतला शासकिय योजनांचा लाभ

नवी मुंबई, दि. १९: ‘विकसित भारत संकल्प यात्रे’चे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुयोग्य आयोजन करण्यात आले असून २४ हजाराहून अधिक नवी मुंबईकर नागरिक ४४ ठिकाणी झालेल्या यात्रा उपक्रमात उत्साहाने सहभागी झाले. २७ डिसेंबर रोजी दिघा येथून सुरु झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेची सांगता से-1 ए सीबीडी बेलापूर येथील सुनिल गावस्कर मैदान या ४५ व्या ठिकाणी १२०० हून अधिक नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाली.

विकसित भारत संकल्प यात्रेच्या सांगता समारंभ प्रसंगी बेलापूर परिसरात नागरिक व विदयार्थ्यांच्या सहभागातून जनजागृतीपर रॅली काढण्यात आली. यामध्ये बँड व लेझीम पथकांच्या तालासूरात विदयार्थी व नागरिकांनी विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन नागरिकांना केले.

सुनिल गावसकर मैदानात संपन्न झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या सांगता समारंभ प्रसंगी बेलापूर विधानसभा सदस्य आमदार मंदाताई म्हात्रे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशभरात आयोजित करण्यात आलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात उत्तम प्रकारे आयोजन केल्याबद्दल आयुक्त महोदय व त्यांच्या अधिकारी, कर्मचारी समुहाचे कौतुक केले. दिघ्यापासून बेलापूरपर्यंत यात्रेतील सर्वच ठिकाणी नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला व त्यामुळे सरकारी योजनांची माहिती व लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहचवता आला याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त्‍ केले.

विधानपरिषद सदस्य आमदार रमेश पाटील यांनीही याप्रसंगी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी अतिरिक्त्‍ आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी नवी मुंबईतील नागरिकांनी संकल्प यात्रा उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल आभार मानत २० जानेवारी पासून सुरु होणाऱ्या शासन आपल्या दारी या उपक्रमातही मोठया संख्येने सहभागी होऊन विविध शासकिय योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

May be an image of 7 people, dais and text

या प्रसंगी बेलापूर विधानसभा सदस्य आमदार मंदा म्हात्रे, विधानपरिषद सदस्य आमदार रमेश पाटील, अतिरिकत्‍ आयुक्त विजयकुमार म्हसाळ व सुजाता ढोले, परिमंडळ-1 चे उपायुक्त्‍ सोमनाथ पोटरे, समाजविकास विभागाचे उपायुक्त किसनराव पलांडे, बेलापूर विभागाचे सहाय्यक आयुक्त्‍ तथा विभाग अधिकारी शशिकांत तांडेल, विकसित भारत संकल्प यात्रेचे नोडल अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त जयंत जावडेकर, कार्यकारी अभियंता संजय पाटील व संजीव पाटील, माजी नगरसेवक डॉ. जयाजी नाथ, अशोक गुरखे, माधुरी सुतार, सुरेखा नरबागे, राजश्री कातकरी व यात्रेचे शासकिय समन्वयक एस.एस.पानसरे व दिग्विजय सिंग तसेच बाळकृष्ण बंदरे आणि इतर मान्यवर व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

सांगता प्रसंगी सुनिल गावसकर मैदानामध्ये विविध योजनांची माहिती देणारे स्टॉल्स प्रदर्शिंत करण्यात आले होते. ज्यामध्ये केंद्र व राज्य शासन तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देणारे व योजनांचा लाभ मिळण्यासाठी अर्ज भरण्यापासून संपूर्ण सहकार्य करण्यात आले. यात पीएम स्वनिधी योजना, स्वनिधी से समृद्धी योजना, आभा कार्ड, आयुष्यमान कार्ड योजना, पीएम उज्ज्वला योजना, पीएम विश्वकर्मा योजना, पीएम मुद्रा लोन, स्वच्छ भारत अभियान, स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया, खेलो इंडिया, पीएमई बस सेवा, आरोग्य तपासणी अशा विविध योजनांच्या स्टॉलचा समावेश होता.

May be an image of 7 people, hospital and text

या ठिकाणी केंद्र सरकारच्या वतीने योजनांच्या माहिती प्रसारणासाठी एलईडी व्हॅनची व्यवस्था करण्यात आली होती. त्यावर पंतप्रधान महोदयांचा संदेश प्रसारित केला जात होता तसेच १२.३० वाजल्यापासून पंतप्रधान महोदय देशभरातल्या विविध ठिकाणच्या नागरिकांशी थेट प्रक्षेपणाव्दारे संवाद साधत होते त्याचेही प्रक्षेपण आमदार महोदयांनी नागरिकांसमवेत पाहिले.

विकसित भारत संकल्प यात्रेच्या ४५ व्या ठिकाणी सुनिल गावसकर मैदान से-1 ए सीबीडी बेलापूर येथील सांगता समारंभ प्रसंगी १२०० हून अधिक नागरिकांनी स्टॉल्सना भेटी देत विविध योजनांची माहिती जाणून घेतली व काही योजनांचे अर्ज भरून लाभही घेतला. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत रक्त तपासणी व क्षयरोग तपासणी कक्षाची स्थापना करण्यात आली होती तेथेही भेट देऊन अनेक नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेतली.

२७ डिसेंबरपासून १८ जानेवारीपर्यंत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिघा ते बेलापूरपर्यंत ४५ ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या विकसित भारत संकल्‍प यात्रेला नागरिकांनी प्रत्येक ठिकाणी उत्तम प्रतिसाद दिला व हा उपक्रम यशस्वी केला त्याबद्दल महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी कोणत्याही सामाजिक कार्यात मनापासून सहभागी होणाऱ्या नवी मुंबईकर नागरिकांचे अभिनंदन केले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *