Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

जाणून घ्या वसंत ऋतूत कशा प्रकारे घ्यावी आरोग्याची काळजी

Springtime Vasant

आयुर्वेद कुतूहल – वसंत ऋतुचर्या 

जाणून घ्या वसंत ऋतूत कशा प्रकारे घ्यावी आरोग्याची काळजी

ह्या वर्षी दिनांक १८ फेब्रुवारी रोजी सौर वसंत ऋतूची सुरवात झाली. वसंत ऋतू उत्तरायणात दुसरा ऋतु, ह्या ऋतूत थंडी ओसरून हळू हळू सूर्याची किरणे तीव्र होऊ लागतात आणि वातावरणात गरमीची चाहूल लागते. वातावरणात अनेक पुष्प, फुले ह्या काळात येतात नवं चैतन्य असते.
ज्याप्रमाणे बर्फाळ भागात सूर्य किरणे पडल्यावर जसा बर्फ वितळतो अगदी त्याचप्रमाणे थंडी नंतर आलेल्या गरमी मुळे ह्या काळात आपल्या शरीरातील कफ वितळतो आणि आपल्याला कफ विकार उद्भवतात. बऱ्याच वेळा दम्याचा त्रास असणाऱ्या व्यक्तींना ह्या ऋतूत दम्याचे वेग येतात, ते हि छातीत कफ अधिक भरल्याने.
* ह्या ऋतूत ऋतुचर्या हि कफ दोषाचे शमन व्हावे ह्या साठी तयार केली आहे.
* ह्या ऋतूत व्यायाम आणि उद्वर्तन म्हणजेच अंगाला उटणे लावणे ह्याला अत्यंत महत्व आहे, ह्याचमुळे शरीरातील अतिरिक्त कफ व मेद हे दोन्ही शरीरातून कमी होतात.
* कफ वाढल्याने ह्या काळात अग्निमांद्य होते. म्हणजेच आपल्या नेहमीच्या भुकेच्या तुलनेत काही अंशी भूक कमी लागते अशा वेळी अधिक मात्रेत केलेला आहार हा हानिकाराकच असतो. ह्यामध्ये अधिक शाररीक परिश्रम करणारे व्यक्ती येत नाहीत कारण त्यांच्या कामामुळे त्यांची पचनशक्ती चांगलीच असते व त्यांना भूकही चांगली लागते.
* कफाचे आधिक्य असल्यामुळे ह्या ऋतूत आहारात कडु, तिखट, तुरट रसाचे पदार्थ असावेत, तसेच आहार हलका असावा, पचायला जड असणारे पदार्थ अधिक खाऊ नयेत.
* तहान लागल्यावर पाणी पिताना ते सहसा उष्णोदक म्हणजे कोमट पाणी असावे, जेणेकरून कफ वाढणार नाही व पचनशक्ती सुधारेल.
* ह्या काळात दिवास्वाप म्हणजे दिवसा झोपणे व्यर्ज आहे ह्यामुळे शरीरात कफ वाढतो असे आयुर्वेदाचे मत आहे. हि अट आजारी आणि वृद्ध व्यक्तींना लागू होत नाही.
* दुपारी बाहेर पडताना ह्या ऋतूत डोके झाकून बाहेर पडावे ह्यासाठी छत्री अथवा कपड्याचा वापर करावा, वसंत ऋतू जरी असला तरी ह्या ऋतूतील दुपार हि उन्हाळ्यासारखीच तीव्र असते.
* आयुर्वेदात स्वास्थ्य टिकून राहण्यासाठी ह्या काळात निरोगी व्यक्तीने देखील वैद्याच्या सल्ल्याने वमन व नस्य हि पंचकर्मे जरूर करावीत ह्यामुळे पुढील रोगांना आळा बसतो. रोगी व्यक्तींनी वैद्याच्या सल्ल्याने ह्याचा लाभ घ्यावा.

भेटूया पुढल्या लेखात नवीन विषय घेऊन तोपर्यंत
आयुष्य जगा आयुर्वेदा संगे ।।
वैद्य शार्दुल चव्हाण
एम. डी. आयुर्वेद
9987925720
shardulchavan88@gmail.com

जगदंब The Ayurvedic World ,

(Disclaimer: सदर लेखातील मते हि लेखक/लेखिकेची स्वतःची मते आहेत. न्युज पोर्टल फक्त एक माध्यम आहे.)

 

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *