Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

जाणून घ्या कलाविश्वाबद्दल सारं काही

जाणून घ्या सारं काही कलाविश्वाबद्दल

ART
The word ART comes from 13th century manuscripts..
कलेे मध्ये सादरीकरण भावनांची अभिव्यक्ती आणि आकारांचे संयोजन या गोष्टी प्रामुख्याने आपण पाहतो . कलेचा प्रवास हा खूप मोठा आणि महत्वाचा विषय आहे. विविध काळातील कलेवर विविध कलाप्रवाहांचा प्रभाव म्हणजेच विविध इझम हा खूप मोठा अभ्यासाचा विषय आहे .
परंतु सर्वसाधारणपणे कलेतील स्थित्यंतरे ही representational art इथपासून सुरू झाली.

प्लेटो ने सर्व प्रथम कले विषयी “mimesis ” अशी संकल्पना मांडली याचा सर्व साधारण अर्थ अनुकरण, सादरीकरण
(Representation or replication).
18 व्या शतका पर्यंत समोर आहे तसच्या तस्स चित्रात उतरवणे याला खूप महत्व होते …..life like portraits ना त्यामुळे त्या वेळी खुप महत्व होते.

त्या नंतर expressions भाव भावनांची अभिव्यव्यक्ती याला ही चित्रात महत्व प्राप्त झाले .चित्रकाराच्या मनातील भाव अचूकपणेे त्याने पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या मनात उतरवला तर ते चित्र उत्कृष्ट समजले जाई.

20 व्या शतकात कला ही जास्तीत जास्त abstraction कडे वळली. कलेची तत्त्व तसेच रचनेची मूलतत्त्वे (design principals)लय ,ताल, तोल ,संयोजन, संक्रमण,विरोध अश्या विविध अंगानी कला तपासली जाऊ लागली .
आधुनिक युगातील कलाकारांवर जागतिक प्रभाव , विविध परंपरांचा प्रभाव, विविध संस्कृतींचा प्रभाव तसेच advance technology चा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो.

Art is a dynamic combination of materials ,methods,concepts,and subjects.

कला हा कलाकाराचा समाजाशी असलेला संवाद असतो.
It’s a lager contextual frame work such as personal ,cultural identity ,family, community and nationality…

समाज मनात कलेे विषयी आणि कलाकारा विषयी नेहमीच कुतूहल असते .कलाकार हे भावना प्रधान असतात आणि ह्यांच्या जाणीवा खूप sharp असतात .
कलाकार स्वतःच्या कलाकृती द्वारे समाजाला स्वतःची ती जाणीव ,ती दृष्टी ,ते vision देत असतो ,म्हणून चित्रकला प्रदर्शन बघणे आपल्या मुलांना ते दाखवणे हे खूप आवश्यक आहे.त्यामुळे आपण आपल्या मुलांना नवीन दृष्टी देउ शकू.

कला शिक्षक म्हणून काम करताना साधला जाणारा संवाद मग तो माझ्या विध्यार्थ्यांनशी अथवा सहशिक्षकांशी, कलाकार मित्रमैत्रिणींशी आणि आतो थेट आपल्या सर्वांशी.
कले संबंधी विविध माहिती व चर्चा या ब्लॉग द्वारे व्हावी
कले विषयी समाजात जागृती व्हावी अभ्यासपूर्ण रीतीने ती आपल्या समोर यावी.
आणि कलाकारांच्या कलेला खरी उन्नत अवस्था यावी हा या ब्लॉग लिहण्या मागचा हेतू…

मेधा थळे – जोशी

(लेखिका ह्या एक चित्रकार तसेच नामवंत कला प्राध्यापिका आहेत)

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *