Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षितिजावरचा तारा निखळला ! ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचं निधन

भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षितिजावरचा तारा निखळला !  ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचं निधन

मुंबई ,दि. 13: किराणा घराण्याच्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचं आज पहाटे पुण्यातील राहत्या घरी निधन झालं. त्या ९० वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनामुळं संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी डॉ. प्रभा अत्रे यांना आज श्रद्धांजली वाहिली.

प्रभा अत्रे यांचा जन्म १३ सप्टेंबर १९३२ रोजी पुण्यात झाला. गाण्याबरोबरच त्यांनी नृत्याचंही प्रशिक्षण घेतलं होतं. संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्कारांनी गौरविण्यात आलं होतं. प्रभाताईंचा शिष्य परिवार मोठा आहे. त्यांच्याकडून संगीताचे धडे घेतलेले अनेक कलाकार आज शास्त्रीय संगीतात योगदान देत आहेत. डॉ. प्रभा अत्रे यांनी आपल्या प्रदीर्घ सांगीतिक कारकिर्दीत नवतेचा अंगीकार केला आणि भारतीय शास्त्रीय संगीत एका मोठ्या उंचीवर नेलं असं राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. तर भारतीय संगीत क्षेत्राला मिळालेलं सृजनशील, अलौकीक प्रतिभा यांचं अनोखं वरदान असलेली एक तेजस्वी गान प्रभा आज निमाली आहे, अशा शोकमग्न भावना व्यक्त करून मख्यमंत्र्यांनी डॉ. प्रभा अत्रे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभाताई अत्रे यांच्या निधनानं ज्ञान, विज्ञान, विधी, कला, साहित्य, संगीत अशा अनेक क्षेत्रात सर्वोच्च कर्तृत्व गाजवणारं प्रतिभावंत व्यक्तिमत्वं हरपलं असून भारतीय शास्त्रीय संगीतातल्या वैभवशाली युगाचा अंत झाला आहे, अशा शब्दात अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. प्रभाताईंनी भारतीय शास्त्रीय संगीताची सेवा करताना नव्या गायक-गायिकांना घडविण्याचे कार्य केलं, असं देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे.
Photo Source – Google Image

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *