जगतविख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन आणि गायक शंकर महादेवन यांच्या बँडला ग्रॅमी पुरस्कार जाहीर
मुंबई, दि. ५: प्रसिद्ध तबला वादक उस्ताद झाकीर हुसैन आणि संगीतकार-गायक, शंकर महादेवन यांच्या शक्ती फ्युजन बँड पथकाला उत्कृष्ट जागतिक संगीत अल्बम श्रेणीत त्यांच्या धीस मोमेंट या अल्बमला आज ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. गेल्या वर्षी जून मध्ये हा अल्बम प्रदर्शित झाला होता. जॉन मॅकलॉग्लीन, झाकीर खान, शंकर महादेवन, व्ही. सेल्वागणेश आणि गणेश राजगोपालन यांनी या अल्बममध्ये गाणी गायली आहेत. दरम्यान उत्कृष्ठ जागतिक संगीत क्षेत्रात पश्तो या अल्बमसाठी देखील झाकीर हसैन यांना ग्रॅमी पुरस्कार जाहीर झाला आहे. बासरी वादक पंडीत राकेश चौरसिया यांना अॅज वी स्पीक या अल्बम साठी आणि उत्कृष्ठ जागतिक संगीतासाठी, असे दोन पुरस्कार जाहीर झाले आहेत. अमेरिकेतल्या लॉस एंजलिसमध्ये आज हा पुरस्कार सोहळा पार पडला.