
मुबई पोलिसांची प्रतिमा मलीन करणाऱ्या प्रकरणाची तपशिलवार इन्साईड स्टोरी वाचा
मुंबई, दि. १: मागील काही काळापासून महिलांवरील वाढलेल्या अत्याचाराच्या घटनांमुळे राज्यातील सामाजिक व राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. महिला सुरक्षेचे उडालेले धिंडवडे जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. राज्य सरकार जनतेला कितीही आश्वस्त करत असलं तरी ज्यांच्या हातात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे त्या पोलीस खात्याचा कारभार पाहता, महिलांवरील अत्याचार कमी होण्याच्या जागी वाढण्याचीच शक्यता जास्त वाटतेय. या धारणेला पुष्टी देणाऱ्या एका प्रकरणाचा भांडाफोड महाराष्ट्रा वार्ता ने दि. ३० जुलै रोजी एका सविस्तर न्यूज रिपोर्ट मार्फत केला व राज्याच्या पोलीस दलात एकच खळबळ उडाली. मुंबईतील सर जे. जे. मार्ग पोलीस स्थानकात Sir J J Marg Police Station कर्तव्यावर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक अनिल हनुमंत शिंदे Anil Hanumant Shinde व इतर पोलीस अधिकाऱ्यांनी एका परदेशी महिलेवरील अत्याचाराच्या प्रकरणात दाखवलेली असंवेदनशीलता चव्हाट्यावर आली आहे.
या प्रकरणात एफआयआर दाखल झाल्यानंतर तब्बल १३ महिन्यांनी सर जे. जे. मार्ग पोलिसांनी माझगाव न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. ज्याचा तपशीलवार अभ्यास केल्यावर असे निदर्शनास आले कि पोलीस उपनिरीक्षक अनिल शिंदे Anil Shinde ने त्या आरोपपत्रात चक्क तीन बनावट पंचमाने जोडले आहेत. महिला अत्याचाराशी संबंधित प्रकरणात जाणीवपूर्वक संशयास्पद व्यवहार करत अकार्यक्षम व भ्रष्ट कारभाराचा नमुना संबंधित अधिकाऱ्यांनी राज्यासमोर मांडला आहे. ज्याचा सविस्तर आढावा आपण या बातमीपत्रातून घेणार आहोत.
माझगाव न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात पोलीस उपनिरीक्षक अनिल शिंदे Police Anil Shinde यांनी दि. २४/०२/२०२३ रोजीचा पिडीतेकडून फोटो ताब्यात घेतल्याचा एक पंचनामा जोडला असून हे सर्व फोटो दोन साक्षीदारांसमक्ष ताब्यात घेतल्याचे त्यांनी भासवले आहे. पिडीतेचे म्हणणे असे कि या तारखेला मुळात मी सर जे. जे. मार्ग पोलीस स्थानकात आलेच नव्हते व जे फोटो पंचनाम्यात ताब्यात घेतल्याचे दाखवले आहेत ते सर्व फोटो मी पीएसआय खान यांना दि. १९ नोव्हेंबर २०२३ ते दि. १५ जानेवारी २०२४ दरम्यान व्हाट्सएप्पमार्फत पाठवले होते. हा पंचनामा पिडीतेसमक्ष न झाल्यामुळे यावर तिची स्वाक्षरीहि झाली नसल्याचे स्पष्ट दिसते आहे.
शिंदे कोणत्या अदृश्य शक्तीसोबत बोलले? त्या पांढऱ्या पाकिटात नेमकं काय होतं?
दिनांक ९ मे २०२३ रोजी पोलीस उपनिरीक्षक अनिल शिंदे Anil Shine Police व खान हे पिडीतेला घटना घडली तेथील ठिकाणांचा घरझडती पंचनामा करण्याच्या हेतूने आधी माझगाव व त्यानंतर भेंडीबाजार येथील ती पूर्वी राहत असलेल्या इमारतीत घेऊन गेले होते. यावेळी या ठिकाणी मोठ्या घडमोडी घडल्या होत्या. भेंडीबाजार येथील घराच्या दारावर पोहोचल्या-पोहोचल्या आलमदार सिक्युरिटी सर्विसेसच्या Alamdar Security Services Private Limited इब्राहीम शिबा नामक कर्मचाऱ्याने पीएसआय अनिल शिंदे यांचे त्यांच्या फोनवरून कोणा अदृश्य शक्तीशी बोलणे करून दिले व यानंतर या घरात माणसे असताना देखील अनिल शिंदे Anil Shinde यांनी पिडीतेला आज घरझडती पंचनामा करता येणार नाही, आपल्याला वरिष्ठांनी बोलावले असल्याचे सांगत तेथून नाट्यमयरित्या काढता पाय घेतला व सोबत आलमदार सिक्युरिटी सर्विसेसच्या माणसांकडून लपतछपत एक ‘पांढरे पाकीट’ घेतले असा आरोप पिडीतेने केला आहे. दिनांक ९ मे २०२३ रोजी हा सर्व घटनाक्रम घडलेला असताना त्यांनी याचा उल्लेख आरोपपत्रात जाणीवपूर्वक केलेला नाही. शिवाय अल-सदा टॉवर AlSadah Tower येथील घराचा घरझडती पंचनामा दिनांक १० मे २०२३ रोजी सायंकाळी १६.१५ ते १६.५५ या वेळेत केल्याचे अनिल शिंदे यांनी दाखवले आहे. नेमकं याच दरम्यान पीडिता सर जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात आली होती; पण आपण घरी गेल्याचे सांगत अनिल शिंदे यांनी तिची बोळवण केली होती. परंतू, दिनांक ९ मे २०२३ व दि. १० मे २०२३ रोजीच्या भेंडीबाजार येथील घरझडती पंचनाम्यावर पिडीतेची स्वाक्षरी झालेली नाहीच वर त्यात भर म्हणजे स्टेशन डायरी मध्येही विसंगती आढळते. पिडीतेचा स्पष्ट आरोप आहे कि आरोपींना मदत व्हावी या हेतूने पीएसआय अनिल शिंदे Police Sub-Inspector Anil Shinde यांनी दिनांक १० मे २०२३ रोजीचा कथित बनावट पंचनामा, भेंडीबाजार येथील घरातील पिडीतेचे व तिच्या मुलांचे सर्व समान(सोने, पासपोर्ट व इतर मौल्यावर ऐवज) आरोपींनी तेथून हलवल्यावर काही दिवसांनी बनवला आहे. दिनांक १० मे २०२३ रोजीच्या घरझडती पंचनाम्यातील एका साक्षीदाराच्या स्वाक्षरीत मोठी विसंगती आढळतेय जी हा पंचनामा बनावट असल्याबाबतच्या आरोपांना पुष्टी देतेय.
बातमीचा पूर्वार्ध वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
परदेशी महिलेवरील अत्याचार प्रकरणी सर जे. जे. मार्ग पोलिसांच्या संशयास्पद कारभारावर प्रश्नचिन्ह !
बनावट पंचनाम्यावरील साक्षीदारांना शिदेंनी ‘दत्तक’ तर घेतलेलं नाही ना?
पिडीत महिलेच्या आरोपांना आधार देणाऱ्या तसेच भविष्यात न्यायालयात आरोपींविरोधातील खटल्यात प्रबळ ठरू शकणाऱ्या काही अतिमहत्वाच्या पुराव्यांच्या पंचनामा प्रक्रियेतही पोलीस उपनिरीक्षक अनिल शिंदे यांनी जाणीवपूर्वक घोटाळा केल्याचे पिडीतेने उपलब्ध केलेल्या कागदपत्रांचा अभ्यास केल्यावर आमच्या शोध पत्रकारिता विभागाला जाणवले.
आरोपपत्रात तपास अधिकारी पीएसआय अनिल शिंदे यांनी पान क्रमांक ३० वर दि. १२/०६/२०२३ रोजी १५.२० ते १६.०० दरम्यान पेनड्राईव्ह ताब्यात घेतल्याचा एक पंचनामा जोडला आहे. पिडीतेचे म्हणणे आहे कि हा पंचनामा १०० टक्के बनावट आहे. कारण या प्रकरणातील आरोपींविरोधातील व्हिडीओ, फोटो व ऑडीओ आदि महत्वाचे पुरावे असलेली SandDisk कंपनीची १६ जीबी क्षमतेची जी पेनड्राईव्ह तिच्याकडून ताब्यात घेतल्याचे अनिल शिंदे यांनी दाखविले आहे ती पिडीतेने दिनांक १०/०५/२०२३ रोजी सायंकाळी १६.४५ दरम्यान सर जे. जे. मार्ग पोलीस स्थानकात तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष बोराटे यांच्या केबिन मध्ये लिफाफाबंद पाकिटातून दिली होती आणि याची एका पत्रावर पोचहि घेतली होती. याबाबत पिडीतेने दि. ११ मे २०२३ रोजी सायंकाळी १९:४७ वाजता तपास अधिकारी पोउनि अनिल शिंदे यांना व्हाट्सएप्प द्वारे कळविले होते. दि. १२/०६/२०२३ रोजीच्या पेन ड्राईव्ह ताब्यात घेतल्याच्या पंचानाम्यावरही पिडीतेची स्वाक्षरी नसून याबाबत स्टेशन डायरीत नोंदही केली गेलेली नाही कारण या तारखेला पीडिता पोलीस स्टेशनला आलीच नव्हती. शिवाय या कथित बनावट पंचानाम्यावरही पंच साक्षिदार म्हणून अल्लाउद्दिन गनी शेख Allauddine Gani Shaikh व बबलू रामनारायण पाल Babloo Ramnarayan Pal या दोघांच्याच स्वाक्षऱ्या आहेत हे विशेष. मुळात इथे प्रश्न असा उपस्थितीत होतो कि पोलीस उपनिरीक्षक अनिल शिंदे यांनी या साक्षीदारांना दत्तक तर घेतलेलं नाही ना? कारण सर्व बनावट पंचनाम्यांवर याच दोघांच्या साक्षिदार म्हणून नोंदी व स्वाक्षऱ्या आहेत.
एक अति गंभीर बाब म्हणजे पेन ड्राईव्हसारख्या माध्यमातून मोबाईल कॉल रेकॉर्डिंग, व्हिडीओ, फोटो, व्हाट्सएप्प चॅट इत्यादी पुरावे ताब्यात घेताना इलेक्ट्रोनिक Evidence संबंधातील भारतीय साक्षी पुरावा अधिनियम, १८७२ चे कलम ६५ बी ची पूर्तता तपास अधिकारी अनिल शिंदे यांनी करणे गरजेचे होते. जे या प्रकरणात हेतुपुरस्सर केले गेलेले नाही असे आढळते. येथेही त्यांनी जाणीवपूर्वक त्रुटी ठेवलेली दिसते.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका संशयाच्या फेऱ्यात
गुन्हा घडल्यावर प्रथम माहिती अहवाल(एफआयआर), मेडीकल रीपोर्ट, विविध प्रकारचे पंचनामे ते अगदी अंतिम आरोपपत्रात शब्दछल करून जाणीवपूर्वक त्रुटी ठेवल्या गेल्याचे हे काही पहिलेच उदाहरण नाही. नुकत्याच पुण्यातील कल्याणीनगर भागात घडलेल्या हिट अँड रन प्रकरणात सुरुवातीला आरोपीला वाचविण्याच्या हेतूने काही पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या अफरातफरीमुळे संपूर्ण पुणे पोलिसांची प्रतिमा डागाळली होती. जी काही अंशी आयुक्तांनी मागाहून केलेल्या डॅमेज कंट्रोलमुळे सावरली गेलीय. पिडीत महिलेशी संबंधित या गंभीर प्रकरणात तर मुंबई पोलिसांची भूमिका सुरुवातीपासून संशयाच्या फेऱ्यातच राहिली आहे. व या संशयावर शिक्कामोर्तब करण्याचं काम न्यायालयात पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्राने केलं आहे.
या सबंध प्रकरणी पिडीत महिलेने पोलीस उपनिरीक्षक अनिल शिंदे व इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांविरोधात सहाय्यक पोलीस आयुक्त(डोंगरी विभाग), पोलीस उपायुक्त परिमंडळ – १, सह पोलीस आयुक्त कायदा व सुव्यवस्था/गुन्हे व मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे पुराव्यांसह ५२ पानी लेखी तक्रार दिली आहे. परंतू, फक्त चौकशांचे फार्स केले जात असून अद्याप दोषी अधिकाऱ्यांवर उचित कारवाई झाल्याचे दिसत नाही. या प्रकरणाचा नव्याने सीआयडी तपास करण्याची मागणी पिडीतेने आपल्या तक्रारीत केली आहे.
या प्रकरणाच्या निमित्ताने मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ व अति वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा त्यांच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांवर धाक नसल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. यामुळेच मग तपास कामात त्रुटी ठेवण्यासह बनावट पंचनामे बनवण्यापर्यंत पोलीस उपनिरीक्षक अनिल शिंदें सारख्यांची मजल जाते. “काय होणार आहे, चार दिवस चौकशी होईल.. मग वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी सेटलमेंट झालं कि सुटलो…” हे अशांच्या डोक्यात पक्क बसलेलं असतं. आरोपी म्हणून समोर प्रभावशाली व्यक्ती, किंवा गट असला कि त्यांनी टाकलेल्या पैशांच्या थैल्यांकडे भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांचा ओढा जास्त असतो. परंतू, मानवी हक्कांची पायमल्ली करणाऱ्या व मानवतेला काळिमा फासणाऱ्या या प्रकरणात भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात मलीन होऊ शकते या बाबीकडे मुंबई पोलिसांचं सपशेल दुर्लक्ष झालेलं पाहायला मिळतंय. या साऱ्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरेल. महाराष्ट्र वार्ताचा शोध पत्रकारिता विभाग या प्रकरणाचा सविस्तर अभ्यास करत असून येत्या काळात आणखी काही धक्कादायक पैलूंवर प्रकाश पडण्याची शक्यता आहे.
फसवणूक, सरकारी दिरंगाई व आर्थिक घोटाळे संदर्भातील आपल्या काही समस्या असतील तर महाराष्ट्र वार्ता डॉट कॉम च्या ‘आपली समस्या’ टीम ला आपण 93722 36332 वर व्हाट्सअप्प आणि news@maharashtravarta.com वर ईमेल द्वारे पुराव्यानिशी माहिती देऊ शकता.
Ali Asgar Rasheed Salman Rasheed Lubna Nuruddine