Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या प्रेरणादायी मुलाखतीने पार पडला “माईंड जिम” उपक्रमाचा वर्धापनदिन

डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या प्रेरणादायी मुलाखतीने पार पडला “माईंड जिम” उपक्रमाचा वर्धापनदिन

(पुणे)

कुंपणे तोडुनि सारी, विरघळून गेले काही
काळाने द्यावी दाद, हा हट्ट ही धरलानाही
झपाटलेपण त्यांचे, कोंबातच मुरले होते…

डॉ. आनंद नाडकर्णी यांनी “वेध”साठी लिहिलेली ही कविता त्यांच्या स्वत:च्या आयुष्याला तितकीच चपखल बसते.. मानसोपचारततज्ञ, व्यवस्थापक, वक्ता, कवी, गीतकार, संगीतकार, नाटककार अशा अनेक भूमिका अक्षरश: जगणार््यास डॉक्टर नाडकर्णी यांनी १८ जुलैच्या मुलाखतीत त्यांनी काढलेल्या रेखाचित्रांमागची भूमिका उलगडून दाखवली, प्रेमकवितांपासून निसर्गकवितांपर्यंत निवडक कविता ऐकवल्या, वेद आणि उपनिषदं यांचा ते सध्या अभ्यास करत आहेत, त्याचा आत्ताच्या काळाशी संदर्भ उलगडून दाखवला. ते सगळं ऐकताना श्रोते अक्षरश: मंत्रमुग्ध झाले होते. या मुलाखतीचं निमित्त होतं आमच्या “माईंड जिम” या उपक्रमाचा वर्धापनदिन. त्यानिमित्तानं आमच्या उपक्रमाची आणि गेल्या वर्षभरातल्या कार्यक्रमांची माहिती अनुराधा करकरे आणि लीना कुलकर्णी यांनी दिली. संज्योत देशपांडे हिनं आभार मानले. डॉ. नाडकर्णी यांची मुलाखत घेणं हा माझ्यासाठी एक प्रेरणादायक आणि आनंददायक अनुभव होता. ही मुलाखत लवकरच युट्यूबवर सगळ्यांसाठी उपलब्ध होणार आहे.)

– नीलांबरी जोशी

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *