Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“मातोश्रीवरील बाळासाहेबांची खोली आमच्यासाठी मंदिर आहे कारण ..” संजय राऊत

“मातोश्रीवरील बाळासाहेबांची खोली आमच्यासाठी मंदिर आहे कारण ..” संजय राऊत

मुंबई: शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी अँजिओप्लास्टी झाल्यानंतर आज पहिली पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. बंद दाराआड शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या दरम्यान झालेल्या चर्चेतील मुद्दे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून लपवून ठेवले का? असा थेट सवाल त्यांनी यावेळी केला.

काल अमित शाह यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना म्हटले की मातोश्री वर बंद दाराआड जी चर्चा झाली ती मी उघड करू शकत नाही. या त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना संजय राऊत म्हणाले की, “मातोश्रीवरील ज्या खोलीमध्ये शाह आणि उद्धव यांच्यामध्ये चर्चा झाली बाळासाहेबांची खोली होती. ही खोली आमच्यासाठी मंदिर आहे कारण याच खोलीमध्ये बसून बाळासाहेबांनी अटलजी, आडवाणींपासून मोदींपर्यंत अनेकांना आशीर्वाद दिले आहेत. या खोलीतच मुख्यमंत्रिपदासह सत्तेच्या समसमान वाटपाचा फॉर्म्युला ठरला होता. येथे झालेली चर्चा कोणी नाकारत असेल तर तो बाळासाहेबांचा आणि महाराष्ट्राचा अपमान आहे.”

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *