Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मुंबई महानगरपालिकेत महापौर पद खुल्या प्रवर्गासाठी तर नवी मुंबई, पनवेल पालिकेत महिला प्रवर्गासाठी राखीव

मुंबई महानगरपालिकेत महापौर पद खुल्या प्रवर्गासाठी तर नवी मुंबई, पनवेल पालिकेत महिला प्रवर्गासाठी राखीव

मुंबई: राज्यातील २७ महानगरपालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत काल नगरविकास विभागाने काढली. या सोडती नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आल्या. यावेळी मुंबई महानगरपालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर तसेच महाराष्ट्रातला प्रमुख महानगर पालिकांचे महापौर आणि उप महापौर यावेळी उपस्थित होते.

या सोडतीमध्ये मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिक महानगरपालिकांमध्ये सर्वसाधारण पुरुष आरक्षण
तर नवी मुंबई, भिवंडी, पनवेल, औरंगाबाद महानगरपालिकांमध्ये सर्वसाधारण महिला आरक्षण लागले आहे.

जाणून घ्या तुमच्या महापालिकेचं महापौर पदाचे आरक्षण

खुला प्रवर्ग, सर्वसाधारण

मुंबई महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

नागपूर महानगरपालिका

ठाणे महानगरपालिका

नाशिक महानगरपालिका

कल्याण -डोंबिवली महानगरपालिका

सांगली महानगरपालिका

उल्हासनगर महानगरपालिका

खुला प्रवर्ग, महिला आरक्षित

नवी मुंबई महानगरपालिका

जळगाव महानगरपालिका

भिवंडी महानगरपालिका

अकोला महानगरपालिका

पनवेल महानगरपालिका

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

औरंगाबाद महानगरपालिका

चंद्रपूर महानगरपालिका

अनुसुचित जमाती

वसई विरार महानगरपालिका

अनुसूचित जाती (महिला)

अहमदनगर महानगरपालिका

परभणी महानगरपालिका

अनुसूचित जाती

मीरा भाईंदर महानगरपालिका

मागास प्रवर्ग (महिला)

नांदेड महानगरपालिका

सोलापूर महानगरपालिका

कोल्हापूर महानगरपालिका

मालेगाव महानगरपालिका

मागास प्रवर्ग

लातूर महानगरपालिका

धुळे महानगरपालिका

अमरावती महानगरपालिका

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *