Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

आरोग्य : ‘जर फक्त भातामुळेच वजन वाढले असते तर कदाचित…’

आरोग्य : ‘जर फक्त भातामुळेच वजन वाढले असते तर कदाचित…’

आयुर्वेद कुतूहल भाग ४१
शाली धान्य (भात, तांदूळ)
भात तसा भारताच्या मूलभूत आहारातील महत्वाचा भाग आहे, विशेषतः कोकण आणि दक्षिण भारतात तांदळाचा वापर अधिक प्रमाणात आहारात केला जातो. परंतु आजकालच्या low carbs diet च्या पद्धतीत भाताला स्थान नाही, म्हणे ‘ह्यामुळे वजन वाढते!’ जर फक्त भातामुळेच वजन वाढले असते तर कदाचित देशातील स्थूलतेचे समीकरण वेगळेच झाले असते, परंतु तसे काही दिसत नाही.
आयुर्वेदात आहारात तांदूळास अनन्य साधारण महत्व आहे, शालिधान्य, षष्टी धान्य असे दोन मुख्य प्रकार आयुर्वेदात आहेत. त्यात शाली धान्यात रक्तशाली म्हणजे लाल तांदूळ आणि षष्टी धान्यात षष्टीशाली म्हणजे साठे सळीचा भात अधिक पथ्यकर सांगितला आहे.
शालिधान्य गुण- शालिधान्य म्हणजे तांदूळ हे मधुर किंचित तुरट रसाचे, शरीरास तृप्ती, शीतलता देणारे, पचायला हलके, बल वाढवणारे, पित्त कमी करणारे, स्निग्ध, कफ व वात किंचित वाढवणारे, ग्राही म्हणजे मलास धरून ठेवणारे अशा गुणांनी युक्त असतात.
भाताने मुख्यतः वजन वाढते त्याचे कारण भात नसून त्यावर होणारे संस्कार, शिजवण्याच्या पद्धती ह्या आहेत, तसे पाहायला गेले तर भाताच्या पेरणी आधीच त्यावर संस्कार चालू होतात आणि त्यामुळे भाताचे गुण बदलतात आणि ते शरीरास फायदा करतात.

संस्कार (१) – दग्ध भूमीत उत्पन्न धान्य
शेतात भाजणी ह्या क्रिये नंतर जे धान्य उत्पन्न होते असे तांदूळ पचायला हलका, किंचित तुरट रसाचा, मल-मुत्राची मात्रा कमी करणारा, किंचित रुक्ष, कफ व मेदाला कमी करणारा असतो.
संस्कार (२) – अतिरोप्य
बऱ्याच वेळा लावणी झालेले तांदूळ हे पचायला हलके, लवकर शिजणारे, गुणांमध्ये उत्तम, दाह कमी करणारे, बल वाढवणारे असतात.
संस्कार (३) – छिन्नरुढ
आधी पेरलेला मग उपटून पुन्हा लावणी केलेला भात किंचित तुरट रसाचा, पचायला हलका, पित्त कमी करणारा कफाला कमी करणारा असतो.
साधारणतः भाताचे आतापर्यंत गुण पहिले तर कुठेही मेदास तो वाढवत नाही बरेचदा जे वजन वाढते ते त्याच्या अयोग्य प्रकारे शिजवल्याने, तसेच अजिबात शरीर श्रम नसल्याने काहीही खाल्ले तरी वजन हे वाढणारच.
आज आपण तांदळाच्या गुणांची त्याच्यावरील शेतातील होणाऱ्या संस्कारांची त्यामुळे त्याच्यातील गुणांच्या बदलाची माहिती पाहिली पुढल्या लेखात आपण तांदळावरील असे संस्कार पाहूया जे आपल्या हातात आहेत आणि ज्यामुळे आपले वजन देखील आटोक्यात आणण्यासाठी मदत होईल.

भेटूया पुढल्या लेखात नवीन विषय घेऊन तोपर्यंत
आयुष्य जगा आयुर्वेदा संगे ।।

वैद्य शार्दुल चव्हाण
एम. डी. आयुर्वेद
9987925720
जगदंब The Ayurvedic World ,
Ayurvedic Clinic and Panchkarma center

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *