अजित पवार व भाजपला धक्का! जयंत पाटील झाले अधिकृत विधिमंडळ गटनेते
मुंबई: अजित पवार आणि भाजप यांच्या बहुमताच्या दाव्याची हवा काढणारी बाब आज समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत गटनेते कोण याबाबत असलेला संभ्रमावर अखेर पडदा पडला. विधिमंडळ सचिव राजेंद्र भागवत यांनी आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं की विधिमंडळ सचिवालयात जयंत पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी अधिकृत नोंद आहे.”
यामुळे आता एक स्पष्ट झालं आहे की जयंत पाटील यांचाच व्हीप आता राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना लागू होईल. यामुळे अजित पवार हे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर घोषित होणे अधिकृतरित्या बाकी राहिले आहे.
काल (२५ नोव्हेंबर)राष्ट्रवादी काँग्रेसने जयंत पाटील यांची विधिमंडळ गटनेते म्हणून सचिवालयात नोंद केली. शिवसेनेनेचे एकनाथ शिंदे तर भाजपचे देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेते म्हणून नोंद आहे. आता प्रश्न हा उपस्थित होतो की येत्या ३० नोव्हेंबर रोजी नेमकं कोणत्या आधारावर भाजप आपलं बहुमत सिद्ध करेल?
