Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

भाजपला आणखी एक धक्का, सर्वोच्च न्यायालयाने दिला उद्याच बहुमत घेण्याचा आदेश

भाजपला आणखी एक धक्का, सर्वोच्च न्यायालयाने दिला उद्याच बहुमत घेण्याचा आदेश

मुंबई: भाजपने केलेल्या सत्ता स्थापनेच्या दाव्या विरोधात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस च्या महाविकास आघाडीने थेट सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. यावर रविवारी आणि काल सलग दोन दिवस सुनावणी झाली. आज सकाळी न्यायालयीन कामकाज सुरू होण्याच्या काही मिनिटांतच न्यायालयाने आपला निर्णय जाहीर केला. उद्या २७ नोव्हेंबर रोजीचं बहुमताची चाचणी घेण्याचा आदेश देत ही चाचणी गुप्तमतदानाने न होता जाहीर मतदानाने इन कॅमेरा थेट प्रक्षेपणात करावी असेही पुढे नमूद केले. विशेष म्हणजे विधानसभा अध्यक्ष निवड न करता ही बहुमत चाचणी केली जाऊ शकते असेही न्यालायने म्हटले.

संभावित घोडेबाजार रोखण्यासाठी हा निकाल महत्वाची भूमिका निभावेल. न्यायालयाचा हा निर्णय भाजप, अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातो.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *