घरात पाणी शिरलं आणि राष्ट्रवादीचे नवाब मलिक मुंबई महापालिकेला म्हणाले ‘धन्यवाद’
मुंबई: गेले चार दिवस मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाची झळ सामान्य मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात बसली. रेल्वे सेवा मोठ्या प्रमाणात बाधित झाली. बसेस तर जवळपास गोगलगाईच्या गतीने चालत होत्या. त्यामुळे सामान्य मुंबईकर हैराण झाले होते. पण या पावसाची झळ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना जेव्हा सोसावी लागली तेव्हा त्यांनी महापालिकेचे “Thanks” बोलून आभारच मानले.
त्याचं झालं असं की काल रात्री पासून पडणाऱ्या पावसामुळे अखेर कुर्ला परिसरात राहणाऱ्या नवाब मलिक यांच्या घरात पाणी शिरलं. थोडं थोडकं नाही तर गुढगाभार पाणी झालं. सगळं फर्निचर, इतर सामान सारं काही भिजून गेलं.
Thanks @MCGM_BMC pic.twitter.com/VTmhEtKcav
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) July 1, 2019
याच बरोबर करून दाखवलं असं ट्विट करत शिवसेनेला, उध्दव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केलं आहे.
My home @uddhavthackeray @ShivSena @CMOMaharashtra @MCGM_BMC
Karun dakhavla@MumbaiNCP @NCPspeaks #MumbaiRainsLive #MumbaiRains pic.twitter.com/372GbptoPQ— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) July 1, 2019
दुसऱ्या एका ट्विट मध्ये नवाब मलिक म्हणाले की, “पावसामुळे आलेले नाल्यातले पाणी जर कुर्लासारख्या भागातील घरात साचू शकते तर सामान्य नागरिक आणि झोपडित राहणाऱ्या गरीब जनतेचे काय हाल असतील. महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे जनतेला त्रास होतो पण सत्ताधाऱ्यांना जनतेशी काही देणेघेणे नाही.”
