मुख्यमंत्री कोकण दौऱ्यावर
रत्नागिरी, दि.२१: आज सकाळी मुंबईहून रत्नागिरी येथे पोहचल्यावर प्रशासनाकडून नैसर्गिक आपत्तीचा आढावा घेतला. नुकसान झालेल्या शेती आणि फळबाग यांचे पंचनामे दोन दिवसांत तातडीने करावेत असे सांगितले आहे.
कोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी मी आलो आहे, केवळ फोटो सेशनसाठी नाही प्रत्यक्ष पंचनामे झाले की नुकसानीचा अंदाज घेऊन मदतीबाबत निर्णय घेणार असे मुख्यमंत्र्यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
यावेळी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ऍड. अनिल परब, आमदार भास्कर जाधव, राजन साळवी, मंत्री उदय सामंत, शेखर निकम आदि उपस्थित होते.
