Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

ऊर्जा मंत्रालय उद्या साजरा करणार “ऊर्जा संवर्धन दिन २०२२”

राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार, राष्ट्रीय ऊर्जा कार्यक्षमता नवोन्मेष पुरस्कार आणि राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेच्या पारितोषिकांचे राष्ट्रपतींच्या हस्ते होणार वितरण

दरवर्षी १४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस साजरा केला जातो. ऊर्जा कार्यक्षमता आणि संवर्धन क्षेत्रात राष्ट्राने केलेल्या कार्याबद्दल माहिती व्हावी हा यामागील उद्देश आहे.

मुंबई, दि. १३: भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या कार्यक्रमाच्या  प्रमुख अतिथी असतील. राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार, राष्ट्रीय ऊर्जा कार्यक्षमता नवोन्मेष पुरस्कारांचे वितरण होणार असून राष्ट्रीय चित्रकला स्पर्धा पारितोषिक विजेत्यांना त्या सन्मानित करतील आणि तसेच यावेळी EV यात्रा पोर्टलचा प्रारंभ देखील करतील.

राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार २०२२

ऊर्जा कार्यक्षमता आणि संवर्धन याविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारीतील ऊर्जा कार्यक्षमता ब्युरोच्या वतीने  दरवर्षी १४ डिसेंबर रोजी  ऊर्जा संवर्धन दिनाचे औचित्य साधून ऊर्जेचा वापर कमी करून ऊर्जा बचत करणाऱ्या औद्योगिक एकके, संस्था आणि आस्थापना यांना राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.

राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार २०२२ साठी एकूण पुरस्कारांची संख्या

1st PRIZE 19
2ND PRIZE 08
CERTIFICATE OF MERIT (COM) 21

राष्ट्रीय ऊर्जा कार्यक्षमता नवोन्मेष पुरस्कार  (NEEIA) २०२२

ऊर्जा कार्यक्षमता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आणि नवकल्पना प्रत्यक्षात साकारणाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय ऊर्जा कार्यक्षमता नवोन्मेष पुरस्कारांची सुरुवात मध्ये 2021 झाली.

राष्ट्रीय ऊर्जा कार्यक्षमता नवोन्मेष पुरस्कार (NEEIA) २०२२ साठी एकूण पुरस्कारांची संख्या

1st PRIZE 02
2ND PRIZE 02
CERTIFICATE OF RECOGNITION (COR) 02

राष्ट्रीय चित्रकला स्पर्धा २०२२

ऊर्जा कार्यक्षमता आणि संवर्धन याविषयी समाजात सातत्याने जाणीव जागृती करण्याच्या उद्देशाने केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने २००५ पासून दरवर्षी ऊर्जा संवर्धन याविषयावर राष्ट्रीय चित्रकला स्पर्धा आयोजित केली जाते. शालेय , राज्य आणि राष्ट्रीय स्तर अशा तीन टप्प्यात ही स्पर्धा घेतली जाते.

‘ईव्ही-यात्रा पोर्टल’ आणि मोबाईल अॅपचा शुभारंभ

वाहनातील नेव्हिगेशन यंत्रणा जवळच्या सार्वजनिक ईव्ही – इलेक्ट्रॉनिक वेहिकल चार्जरविषयी माहिती देऊ शकेल अशा प्रकारचे  एक मोबाइल ऍप्लिकेशन ऊर्जा कार्यक्षमता ब्युरोने विकसित केले आहे, देशातील ई-मोबिलिटीला चालना देण्यासाठी केंद्रीय आणि राज्य-स्तरीय विविध उपक्रमांची माहिती देणारी वेबसाइट आणि   सीपीओना त्यांचे चार्जिंग तपशील राष्ट्रीय ऑनलाइन डेटाबेसमध्ये सुरक्षितपणे नोंदणी करण्यास सक्षम करण्यासाठी वेब-पोर्टल विकसित केले आहे.

इलेक्ट्रॉनिक वेहिकल चार्जरविषयी माहिती देऊ शकेल अशा प्रकारचे EV यात्रा हे एक मोबाइल ऍप्लिकेशन डिझाइन आणि विकसित केले गेले आहे. हे मोबाईल ऍप्लिकेशन गुगल प्ले स्टोअर आणि ऍपल स्टोअर वरून आयफोन आणि अँड्रॉइड दोन्ही स्मार्टफोनवर सहजपणे डाउनलोड केले जाऊ शकते आणि सोयीस्करपणे इन्स्टॉल  केले जाऊ शकते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *