Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 9372236332 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 9372236332

तंबाखू नियंत्रण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यशाळेचे मुंबईत आयोजन

तंबाखू नियंत्रण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यशाळेचे मुंबईत आयोजन

मुंबई, दि. १८ : महाराष्ट्रात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या नियंत्रणासाठी आरोग्य विभागानी ३ ऑक्टोबर २०२४ रोजी WHO FCTC Artical ५.३ अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तंबाखू विक्री साठी परवाना देण्यासाठी नियमावली यासंदर्भात सार्वजनिक आरोग्य विभाग, मराठवाडा ग्रामीण विकास संस्था (MGVS) व टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राज्यस्तरीय कार्यशाळा झाली.

राज्यात तंबाखू नियंत्रण कायदा 2003 व FCTC (Framwork convention on Tobaco control) article ५.३ ची प्रभावी अंमलबजावणी होण्याकरिता संबंधित विभाग व यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेमध्ये सहायक पोलिस महानिरिक्षक राजतिलक रोशन यांनी तंबाखू नियंत्रण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस विभागाचे पूर्णपणे सहकार्य राहील असे सांगितले. टोबॅको कंट्रोल, साऊथ एशीया, वाइटल स्टृटॅजी डॉ.राणा जे.सिंग यांनी १८ वर्षाखालील मुलांना तंबाखुच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी उपाययोजना? तसेच तंबाखु नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रत्येक विभागाची असल्याचे सांगितले.

डॉ.अर्जुन सिंग यांनी लहान वयात व्यसनास बळी पडल्यामुळे निर्माण होणारा कॅन्सरचा धोका याबाबत मार्गदर्शन केले. मराठवाडा ग्रामीण विकास संस्थाचे सचिव अप्पासाहेब उगले यांनी महाराष्ट्रात ‘कोटपा’ (सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादन कायदा) कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, याबाबत सविस्तर माहिती दिली. कायदेशीर तरतुदीनुसार तंबाखू क्षेत्रातील उद्योग आरोग्य संस्था व त्यांच्या धोरणांमध्ये हस्तक्षेप करत असतील तर संबंधित विभागाने जिल्हाधिकारी यांच्याकडे संपर्क साधून कळवावे, असेही यावेळी सूचित करण्यात आले.

तंबाखू नियंत्रणावरील FCTC article 5.3 च्या मार्गदर्शक सूचना अधोरेखित करण्यात आल्या. या धोरणानुसार किरकोळ तंबाखू विक्रेत्यांची संख्या आणि तंबाखू उत्पादनाचे प्रकार मर्यादित करते. विशेषत: तरुणांना तंबाखूजन्य पदार्थांपासून रोखणे हा मुख्य उद्देश आहे.

कार्यशाळेसाठी आरोग्य, शिक्षण, अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस विभाग, महानगरपालिका, महसूल विभागाचे तसेच जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते.

आरोग्य सेवा संचालक डॉ.नितीन अंबाडेकर, हेलीस सेक्शेरीया इन्स्टिटय़ूट फॉर पब्लिक हेल्थचे संचालक, डॉ.प्रकाश गुप्ता टोबॅको कंट्रोल, साऊथ इस्ट, एशिया, वाइटल स्टृटॅजीस संचालक, डॉ.राणा जे.सिंग यांच्यासह टाटा मेमोरियल सेंटर मुंबई, Tobacco control, vital strategies चे तांत्रिक सल्लागार डॉ.शिवम कपुर, oral public health department चे उपसंचालक डॉ. उमेश शिरोडकर, आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन,टाटा मेमोरियल सेंटरचे प्रोजेक्ट अधिकारी डॉ..राहुल सोनवणे, NTCP चे कार्यक्रम अधिकारी किशोर गांगुर्डे, अध्यक्ष मनसुख झांबड, मराठवाडा ग्रामीण विकास संस्थाचे सचिव अप्पासाहेब उगले, डॉ.निकिता गायकवाड यांनी सूत्र संचालन केले व अन्नपूर्णा ढोरे यांनी आभार मानले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *