या अंतर्गत टेली-मानस या हेल्पलाइनला ऑक्टोबर २०२२ मध्ये सुरुवात झाल्यापासून १० लाखाहून अधिक दूरध्वनी प्राप्त झाले
मुंबई, दि. २९: भारतातील राष्ट्रीय टेली-मानसिक आरोग्य कार्यक्रमाने एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे, त्यांच्या टेली-मानस टोल-फ्री क्रमांकावर १० लाखांहून अधिक दूरध्वनी आले असून,दररोज सरासरी ३,५०० दूरध्वनी त्यांना प्राप्त होत आहेत.केंद्र सरकारने ऑक्टोबर २०२२ मध्ये देशभरात मानसिक आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी सुरू केलेल्या या उपक्रमाअंतर्गत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण ५१ टेली-मानस केंद्रे चालवली जातात.
टेली-मानस टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांक १४४१६ किंवा 1-800-891-4416 हे बहुभाषिक सेवा पुरवतात आणि फोन करणारा आणि मानसिक आरोग्य समुपदेशक यांच्यातील संवाद सुलभ करण्यासाठी हा क्रमांक अतिशय उपयुक्त ठरला आहे.
देशातील मानसिक आरोग्य सेवांविषयी वाढलेली जागरूकता आणि वापराचे प्रतिबिंब दर्शवित, टेली-मानस हेल्पलाइनद्वारे कॉल करणाऱ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ दिसून आली आहे, डिसेंबर २०२२ मधील सुमारे १२,००० वरून मे २०२४ मध्ये ९०,००० पर्यंत या दूरध्वनीमध्ये वाढ झाली आहे. मानसिक आरोग्य उपक्रमांमधील सातत्यपूर्ण गुंतवणुकीचे महत्त्व आणि उपक्रमांचा विस्तार सुनिश्चित करत प्रत्येकाला आवश्यक मदत पुरवणे ही वाढ अधोरेखित करते.
मानसिक आरोग्य सेवा घेणाऱ्यांची काळजी आणि सहाय्य सुनिश्चित करण्यासाठी, हा मंच त्याचा पाठपुरावा करणारे दूरध्वनी देखील यात समाविष्ट करते. विद्यमान मानसिक आरोग्य संसाधनांना जोडून आणि सर्वसमावेशक डिजिटल नेटवर्कची स्थापना करून, Tele-MANAS हे देशाच्या मानसिक आरोग्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एक महत्वपूर्ण व्यासपीठ बनले आहे.