Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

राज्यात पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या एकूण पाच जागांसाठी चालू असलेल्या मतदानाची सद्यस्थिति जाणून घ्या

राज्यात पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या एकूण पाच जागांसाठी चालू असलेल्या मतदानाची सद्यस्थिति जाणून घ्या

मुंबई, दि. ३०: राज्यात पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठीच्या एकूण पाच जागांसाठी आज मतदान होत आहे. आज सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली. कोकण शिक्षक मतदारसंघासाठी सकाळी १२ वाजेपर्यंत २७ पूर्णांक १ शतांश टक्के मतदान झालं होतं. नागपूर शिक्षक मतदारसंघातल्या ६ जिल्ह्यांमध्ये दुपारी २ वाजेपर्यंत सरासरी ६० पूर्णांक ४८ दशांश टक्के मतदान झालं. नाशिक पदवीधर मतदार संघात २ वाजेपर्यंत ३१ पूर्णांक ७१ दशांश टक्के मतदान झालं. औरंगाबाद पदवीधर मतदार संघात २ वाजेपर्यंत ५८.२७ टक्के मतदान झालं. अमरावती पदवीधर मतदार संघात २ वाजेपर्यंत ३० पूर्णांक ४० शतांश टक्के मतदान झालं.
कोकण शिक्षक मतदारसंघातून बाळाराम पाटील (मविआ), ज्ञानेश्वर म्हात्रे (भाजप-बाळासाहेबांची शिवसेना) यांच्यात थेट लढत आहे. तर नाशिक पदवीधर मतदारसंघातून अनुक्रमे सत्यजीत तांबे (अपक्ष), धनराज विसपुते (अपक्ष), धनंजय जाधव (अपक्ष) व शुभांगी पाटील (अपक्ष) या प्रमुख चार अपक्ष उमेदवारांमध्ये थेट लढत पाहायला मिळते आहे. अशाच प्रकारे औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात विक्रम काळे (राष्ट्रवादी काँग्रेस), किरण पाटील (भाजप); नागपूर शिक्षक मतदारसंघात सुधाकर अडबाले (मविआ पाठिंबा), नागो गाणार (भाजप पाठिंबा) तर अमरावती पदवीधर मतदारसंघात धीरज लिंगाडे (मविआ – काँग्रेस) व डॉ. रणजित पाटील (भाजप) यांच्यात थेट लढती पाहायला मिळत आहेत.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *