Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

राज्यात दिवसभरात २२९ नवीन रुग्णांचे निदान; राज्यातील एकूण रुग्णसंख्या १३६४ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

राज्यात दिवसभरात २२९ नवीन रुग्णांचे निदान; राज्यातील एकूण रुग्णसंख्या १३६४ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

राज्यातील १२५ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या २२९ नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्णसंख्या १३६४ झाली आहे. कोरोनाबाधित १२५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ११४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३० हजार ७६६ नमुन्यांपैकी २८हजार ८६५जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत तर १३६४ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

आतापर्यंत १२५ कोरोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ३६ हजार ५३३ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ४७३१ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.

दरम्यान, आज राज्यात २५ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैंकी पुण्यातील १४, मुंबईतील ९  तर मालेगाव आणि रत्नागिरी येथे प्रत्येकी १ मृत्यू झाला आहे.   आज झालेल्या मृत्यूंपैकी १५ पुरुष तर १० महिला आहेत. आज झालेल्या २५ मृत्यूंपैकी १२ जण हे ६० वर्षांवरील आहेत तर मुंबईत निधन झालेल्या एका महिलेचे वय १०१ वर्षे आहे. ११ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत तर दोघेजण ४० वर्षांपेक्षा लहान आहेत. मृत्युमुखी पडलेल्या २१ रुग्णांमध्ये (८४ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब,अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांचा तपशील –

मुंबई                 ८७६ (मृत्यू ५४)

पुणे  मनपा        १८१ ( मृत्यू २४)

पुणे (ग्रामीण)              ०६

पिंपरी चिंचवड मनपा   १९

सांगली                   २६

ठाणे  मनपा             २६  (मृत्यू ०३)

कल्याण डोंबिवली मनपा  ३२  (मृत्यू ०२)

नवी मुंबई मनपा  ३१  (मृत्यू ०२)

मीरा भाईंदर        ०४ (मृत्यू ०१)

वसई विरार मनपा  ११ (मृत्यू ०२)

पनवेल मनपा              ०६

ठाणे ग्रामीण, पालघर ग्रामीण (मृत्यू १) प्रत्येकी ०३

नागपूर                 १९ (मृत्यू ०१)

अहमदनगर मनपा    १६

अहमदनगर ग्रामीण  ०९

उस्मानाबाद, अमरावती मनपा (मृत्यू २), यवतमाळ, रत्नागिरी (मृत्यू २)  प्रत्येकी  ०४

लातूर मनपा          ०८

औरंगाबाद मनपा   १६ (मृत्यू ०१)

बुलढाणा                      ११ ( मृत्यू ०१)

सातारा                ०६ (मृत्यू ०१)

अकोला                            ०९

कोल्हापूर मनपा    ०५

मालेगाव                     ०५   (मृत्यू ०१)

उल्हासनगर मनपा, नाशिक मनपा व ग्रामीण, जळगाव ग्रामीण व मनपा, औरंगाबाद ग्रामीण, जालना, हिंगोली, गोंदिया, वाशिम, बीड, सिंधुदुर्ग प्रत्येकी १ (मृत्यू १ जळगाव )

एकूण- १३६७ त्यापैकी १२५ जणांना घरी सोडले तर ९७ जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात या प्रकारे एकूण ४२६१ सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी १६ लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *