Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांसाठी ऑनलाईन ई-पासची सुविधा देणारी प्रक्रिया वेळखाऊ, १७-१८ तास होऊनही अद्याप पास वितरण नाही

अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांसाठी ऑनलाईन ई-पासची सुविधा देणारी प्रक्रिया वेळखाऊ, १७-१८ तास होऊनही अद्याप पास वितरण नाही

मुंबई – सध्या देशभरात लागू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्यात अत्यावश्यक सेवा आणि वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना पोलीस यंत्रणेमार्फत ई-पास देण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन प्रणाली तयार करण्यात आली असून covid19.mhpolice.in या लिंकवर जाऊन संबंधितांना अर्ज करता येईल.

….पण प्रक्रिया फार वेळखाऊ व त्रुटीयुक्त

पोलीस प्रशासनाने अत्यावश्यक सेवांमध्ये मोडणाऱ्या लोकांसाठी ही सोय जरी केली असली तर कालपासून ज्यांनी आपले तपशील जोडून या पास साठी आवेदन केले आहे त्यांनाही अद्याप पास उपलब्ध झालेले नाहीत. ‘महाराष्ट्र वार्ता’ च्या प्रतिनिधींनी यावर आपली माहिती जोडून जवळपास १८ तास लोटले तरी अद्याप प्रक्रिया चालू असल्याचेच सांगितले जात आहे. यावरून काय ते लक्षात येईल. जीवनावश्यक सेवा पुरवणाऱ्या विशेषतः आरोग्य सेवा तसेच नाशवंत पदार्थांची ने आण करणाऱ्या वाहनांना एवढा काळ थांबणे शक्य नाही. त्यादरम्यान त्यांना मोठं नुकसान होण्याची जास्त शक्यता आहे. ऑनलाईन फॉर्म भरताना एक गोष्ट आणखी जाणवली ती म्हणजे यात तपशील भरण्यासाठीचे फार कमी रकाने आहेत. कंपनी ओळखपत्र/ID अपलोड करताना मागची बाजू ज्यावर ऑफिसचा पत्ता, वेबसाईट व इतर तपशील असतात ते अपलोड करायचा ऑप्शन दिलेला नाहीये. फक्त पुढील बाजू अपलोड करता येतेय. पोलीस प्रशासनाने किमान याकामी प्रशिक्षित कर्मचारी नेमून लवकरात लवकर पास कसे वितरित करता येतील हे पाहणे गरजेचे आहे. सध्यातरी ही प्रक्रिया मंद गतीने चालू असल्याचे चित्र आहे.

जाणून घ्या नेमकी कशी आहे प्रक्रिया

सध्या लागू असलेल्या लॉकडाऊन कालावधीत भाजीपाला, अन्नधान्य, औषधे, दूध इत्यादी विविध प्रकारच्या जीवनावश्यक सामग्रीच्या वाहतुकीस मान्यता देण्यात आली आहे. पण यासाठी वाहतूक सुरु करण्यापूर्वी संबंधित वाहनास प्रशासनाची मान्यता घेणे आवश्यक आहे. यासाठी सध्या पोलीस, आरटीओ तसेच जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत अशा वाहनांना पास देण्यात येत आहेत. आता याबरोबरच संबंधित वाहनधारकांना ऑनलाईन प्रणालीमार्फतही ई-पास देण्यात येणार आहेत यासाठी त्यांनी covid19.mhpolice.in या लिंकवर जाऊन अर्ज करुन आपला ई-पास प्राप्त करुन घ्यावा, असे राज्य शासनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. ऑनलाईन प्रणालीवरुन प्राप्त अर्जाची पोलिसांमार्फत पडताळणी केली जाईल. त्यानंतर वाहनधारकाला आपला ई-पास ऑनलाईन प्रणालीवरुनच डाऊनलोड करुन घेता येईल. हा पास प्राप्त झाल्यानंतर वाहनधारक वाहतूक करु शकेल.

सर्व अत्यावश्यक सेवा देणाऱ्या संस्था, व्यक्ती या प्लॅटफॉर्मवरुन ई-पाससाठी अर्ज करू शकतात. याठिकाणी सर्व आवश्यक माहिती भरुन अर्ज दाखल केल्यानंतर टोकन आयडी प्राप्त होतो. त्याचा वापर अर्जाची स्थिती तपासण्यासाठी करता येईल. पोलिस यंत्रणेच्या मान्यतेनंतर किंवा पडताळणीनंतर टोकन आयडी वापरुन ई-पास डाउनलोड करूता येईल. ई-पासमध्ये अर्जदाराची माहिती, वाहन क्रमांक, वैधता तारीख आणि क्यूआर कोड असेल. प्रवास करताना ई-पासची सॉफ्ट तसेच हार्ड कॉपी जवळ ठेवावी आणि विचारणा केल्यावर पोलिसांना दाखवावी, असे या पत्रकात म्हटले आहे. वैध तारखेनंतर त्याचा वापर किंवा अन्य प्रकारे गैरवापर केल्याचे आढळल्यास तो दंडनीय गुन्हा मानला जाईल.

 

(कोणत्याही प्रकारच्या बातम्यांसाठी / तक्रारींसाठी    ९३७२२३६३३२ या क्रमांकावर व्हाट्सअप्प करू शकता)

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *