
“वैद्यकीय उपचार सर्वसामान्यांना परवडण्याजोगे बनवण्याला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य” – पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली, दि. ६: वैद्यकीय उपचार सर्वसामान्यांना परवडण्याजोगे बनवण्याला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आरोग्य आणि वैद्यकीय संशोधन या विषयावर आयोजित अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित करताना बोलत होते. आरोग्य सेवा किफायतशीर आणि सर्वसमावेशक होण्यामध्ये तंत्रज्ञानाची भूमिका महत्वाची असल्यामुळे, आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्यावर सरकारने विशेष लक्ष केंद्रित केल्याचं ते यावेळी म्हणाले.
आयुष्मान भारत आणि जन औषधी योजनेमुळे गरीब आणि मध्यम वर्गीय जनतेच्या एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त पैशाची बचत झाल्याचं ते म्हणाले. केंद्र सरकारने आरोग्य सेवेला केवळ आरोग्य मंत्रालयापर्यंत सीमित ठेवलं नसून, त्यासाठी ‘संपूर्ण सरकार’ हा दृष्टिकोन ठेवल्याचं त्यांनी सांगितलं.