Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजप युतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पनवेल येथे संपन्न

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजप युतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पनवेल येथे संपन्न

पनवेल : लोकसभा निवडणूकीच्या तारखा घोषित झाल्यानंतर सर्व राजकीय पक्षांमध्ये बैठका, सभा यांचे सत्र सुरू झाले आहे. दोनच दिवसांपूर्वी अजित पवार यांची आघाडीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक काँग्रेस भवन, पनवेल येथे पार पडली होती आणि काल शिवसेना-भाजप युतीनेही अशोका लॉन, पनवेल येथे पदाधिकारी मेळावा आयोजित केला होता. या प्रसंगी शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार श्रीरंग बारणे, स्थानिक भाजप आमदार प्रशांत ठाकूर, माजी खासदार रामशेठ ठाकूर, उरणचे आमदार मनोहर भोईर, आमदार प्रवीण दरेकर, शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत, संपर्कप्रमुख दत्ताजी दळवी व माजी जिल्हाप्रमुख बबन पाटील उपस्थित होते. मावळ मतदार संघात पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर झाली असली तरी युतीने अद्याप आपल्या उमेदवाराची घोषणा केलेली नाही. पण खासदार श्रीरंग बारणे यांची उमेदवारी पक्की असल्याचे कळते. त्यामुळे त्यांनी प्रचाराला सुरुवातही केली आहे. लोकसभा निवडणुकीत मावळ मतदार संघात कोकण पट्ट्यातील पनवेल, उरण, कर्जत या विधानसभा मतदारसंघातील मतदार महत्वाची भुमिका बजावणार आहेत. त्यामुळे सर्वात जास्त बैठका आणि सभा याच येथेच होतील यात काही शंकाच नाही.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *