Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

धक्कादायक! कोविड रुग्णाला दिले श्वानदंशाचे इंजेक्शन; पनवेल मनपाच्या खारघर आरोग्य केंद्रावरील प्रकरण उघड

महाराष्ट्र वार्ता च्या आपली समस्या टीम ने केला पर्दाफाश; अधिकाऱ्यांकडून प्रकरण दाबण्याचे पुरेपूर प्रयत्न

पनवेल, दि.१ : पनवेल महानगरपालिकेच्या आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे काढणार्‍या एका गंभीर प्रकरणाचा पर्दाफाश महाराष्ट्र वार्ता आजच्या या सदरात करत आहे.

दिनांक ८ नोव्हेंबर २०२० दरम्यान पनवेल महापालिकेच्या वादग्रस्त खारघर येथील नागरी आरोग्य केंद्रावर कोविड पॉजिटिव असलेला एक माणूस येतो. या ठिकाणी पुढील उपचारांसाठी त्याची कोविड सेंटरला रवानगी करण्याची लगबग चालू असते. आणि इतक्यात एका बाकड्यावर बसलेला असताना एक परिचारिका त्याला कोणतीही विचारपूस न करता चक्क कुत्रा चावल्यावर देण्यात येणारे अँटी रेबिज इंजेक्शन टोचून निघून जाते. तद्नंतर आपली चूक ध्यानात आल्यावर इथल्या नर्सिंग स्टाफ च्या प्रमुख व इतर डॉक्टर हे प्रकरण जागेवरच दाबतात.

हे सारं वाचून तुम्हाला धक्काच बसला असणार किंबहूना यावर तुम्हाला विश्वास ठेवणे अवघड जाईल. पण हो ही सत्य घटना आहे. हे प्रकरण दबलं गेलंही असतं परंतू सदर घटना घडल्यावर ज्या इसमाला कुत्रा चावल्याचे इंजेक्शन देण्यात येणार होते त्याच्याच ओळखीच्या माणसामार्फत ही बातमी उडत-उडत महाराष्ट्र वार्ता पर्यंत आली व या प्रकरणाचा भांडाफोड झाला. या प्रकरणी खातरजमा करण्यासाठी आमच्या स्थानिक टीम ने ज्यांना इंजेक्शन मारले गेले त्या जितेंद्र शुक्ला यांचा खारघर भागात शोध घेतला. परंतू सुरक्षारक्षकाचे काम करणारे शुक्ला हे मुंबईत नव्या ठिकाणी कामास रुजू झाल्याचे आमच्या टीम ला कळले. जुन्या ठिकाणाहून कसाबसा त्यांचा मोबाईल क्रमांक मिळवत आम्ही जितेंद्र शुक्ला यांच्याशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी ‘त्या’ दिवशी खारघर नागरी आरोग्य केंद्रावर नेमकं काय घडलं याची वरीलप्रमाणे ऑन रेकॉर्ड माहिती दिली. महाराष्ट्र वार्ता च्या मुंबई टीम ने या प्रकरणी पीडित शुक्ला यांच्या ठिकाणाबाबत खातरजमा केली हे विशेष.

हे प्रकरण सहज घेण्यासारखे नक्कीच नाही. प्रशासनातील अधिकाऱ्यांचा यंत्रणेवर नसलेला वाचक याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या चुकांकडे कानाडोळा करण्यात धन्यता मानणाऱ्या वरिष्ठ अधिकारी व आयुक्त यांच्याकडून सुप्रशासनाची आशा आपण बाळगावी तरी कशी हे पनवेल-खारघरकरांना पडलेलं मोठं कोडं आहे. आपल्याच करांच्या पैशांतून उभ्या राहिलेल्या अशा आरोग्य केंद्रांवर जर सामान्य करदात्याला बेवारशी कुत्र्यांवर केल्या जाणाऱ्या उपचारांपेक्षाही वाईट उपचार मिळणार असतील तर अशा यंत्रणा कायमच्या बंद करणं इष्ट ठरावे.

जवळपास दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ने खारघर येथील याच नागरी आरोग्य केंद्रावरील एका प्रकरणाचा भंडाफोड केला होता. या ठिकाणी एका महिला परिचारिकेकडून डॉक्टर ना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी तसेच वरिष्ठ परिचारिकांच्या डॉक्टरांवरील दादागिरीचा प्रकार समोर आला होता. या संदर्भातला विडियो सबंध महाराष्ट्रानेही पाहिला. ही बाब महानगरपालिकेचे आयुक्त व आरोग्य अधिकारी डॉक्टर गोसावी यांच्या नजरेस आणून दिली होती परंतू त्यांनी चक्क या परिचारीकांना अभय दिले. पालिका आयुक्त व अधिकार्‍यांच्या याच बेजबाबदार कारभारामुळे अखेर याच केंद्रावर कोविड रूग्णाला रेबिज(श्वानदंश) चे इंजेक्शन देण्याचा प्रकार घडला. यावर आता आयुक्त सबंध प्रकरणी फक्त चौकशी करत बसणार की कारवाई ही करणार हे पाहणे लक्षणीय ठरेल. अशा प्रकरणांत मुळात ‘सीआयडी’ चौकशी होणं अपेक्षित आहे. तसेच या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जातीने लक्ष घालणे गरजेचे आहे नाहीतर असे प्रकार राज्यात वारंवार होत राहतील. सध्यातरी पनवेल महानगरपालिकेतील या अशा घटनांची दखल न सत्ताधारी घेताना दिसत आहेत न विरोधक.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *