Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पनवेल येथील घोटाळेबाज सोळंकी बिल्डर्स बाबत पंचायत समिती प्रशासनाचा धक्कादायक खुलासा

हात झटकत ‘सिडको नैना’ च्या कोर्टात टोलवला चेंडू, म्हणाले कारवाईचे अधिकार सिडकोला

पनवेल, दि.९: महिन्याभरापूर्वी दि. ८ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ने पनवेल तालुक्यातील मु. चेरवली येथील ६४ घरांच्या एका अनधिकृत गृहनिर्माण प्रकल्पाची पोलखोल केली होती. या प्रकरणी विकासक ललित जैन अद्याप मोकाट असून सदर बांधकामावर अद्याप पाडकामाची कारवाई न पंचायत समिती ने केलीय न सिडको नैना ने. या प्रकरणी आमच्या प्रतिनिधीने पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यु. डी. पाटील यांना वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु हे अधिकारी महाशय त्यांना टाळतच आहेत. यामुळे आखेर वाजे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांना त्यांनी संपर्क साधला. यावेळी ते म्हणाले की सदर अनधिकृत बांधकाम ज्या ग्रामसेवकाच्या कार्यकाळात झाले त्यांचे असे म्हणणे आहे की चेरवली-वाजे हा परिसर सिडको नैना प्रकल्पांतर्गत  मोडत असल्याने हे  बांधकाम पाडण्याची व विकासक  ललित जैन  वर कारवाई करण्याची जबाबदारी ही सिडको नैना प्राधिकरणाचीच आहे. या बांधकामाला ग्रामपंचायतीने कोणत्याही प्रकारच्या परवानग्या दिलेल्या नाहीत.

या संदर्भात आम्हाला काही दिवसांपूर्वी आठवड्यात आपले सरकार पोर्टलद्वारे आम्ही केलेल्या तक्रारी चे उत्तर प्राप्त झाले असून संबंधित विभागाने वाजे ग्रुप ग्रामपंचायतीने या विकासकाला दि. २२-०६-२०१६ रोजी दिलेले न हरकत प्रमाणपत्र जोडले आहे. हे पत्र वाचून तुम्हाला कळेल की हा विभाग सिडको नैना प्रकल्पात मोडत असूनही सोलंकी बिल्डर ला ग्रामपंचायतीने ना हरकत प्रमाणपत्र दिलं. नक्कीच यात आर्थिक हितसंबंध गुंतले असण्याची दाट शंका आहे. आम्हाला पडलेला प्रश्न असा की आम्ही केलेली तक्रार पनवेल गट विकास अधिकार्‍यांनी स्वतःहून सिडको नैना कडे हस्तांतरित का नाही केली? या संदर्भात महाराष्ट्र वार्ताने सिडको च्या अनधिकृत बांधकाम कारवाई विभागाला(CCUC) नैना तसेच सिडकोचे व्यवस्थाकीय संचालक संजय मुखर्जी यांनाही यासंदर्भात ईमेल द्वारे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. या ठिकाणी थोडे थोडके नव्हे तर ६४ घरांचे हे अनधिकृत बांधकाम पूर्णत्वास जाईपर्यंत सिडको अधिकारी या दरम्यान नेमकं काय करत होते हा सवालही अद्याप अनुत्तरित आहे. आम्ही सिडको नैना सीसीयूसी अधिकारी यांना गेले दोन दिवस संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असून अद्याप त्यांच्यासोबत आमच्या प्रतिनिधीला वार्तालाप करता आलेला नाही.

सध्यातरी चेंडू सिडकोच्या कोर्टात असून विकासक ललित जैन याच्यावर व त्याच्या अनधिकृत बांधकामावर कारवाईसाठी सिडको कोणता मुहूर्त निवडते हे पाहणे लक्षणिय ठरेल. याच सोबत हे बांधकाम कार्यसिद्धीस नेण्यास ज्या पंचायत समिती व सिडको अधिकार्‍यांनी प्रचंड कष्ट उपसले त्यांच्यावरही कठोर कारवाईचा बडगा उचलला जाणे गरजेचे आहे.

पहा काय म्हणतंय वाजे ग्रामपंचायत

पान क्र. २

 

 

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *