मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे जिल्ह्याच्या शिवभोजन केंद्राचे रविवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई: गरीब व गरजू व्यक्तींना स्वस्त दरात शिवभोजन उपलब्ध करुन देण्याच्या योजनेचा मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातील शिवभोजन केंद्राचे उद्घाटन संबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते २६ जानेवारी २०२० रोजी होणार आहे.
मुंबई उपनगरच्या शिवभोजन केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री तथा पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. रविवार, दि. २६ जानेवारी रोजी सकाळी ९.५० वा. शिवभोजन केंद्र मे. गणेश फूड कोर्ट, सातवा मजला,नवीन प्रशासन भवन (जिल्हाधिकारी कार्यालय) मुंबई उपनगर, शासकीय वसाहत जवळ, बांद्रा (पूर्व), मुंबई -51 येथे होणार आहे.
मुंबई शहरच्या शिवभोजन केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री तथा वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते होणार आहे. रविवार, दि. २६ जानेवारी २०२० रोजी सकाळी. ११.३० वाजता श्री.हरीश बंगेरा व्यवस्थापक, सत्कार कॅटरर्स, स्टाफ कॅन्टीन, बा.य.ल. नायर धर्मा. रुग्णालय, तळमजला, मुंबई सेंट्रल, मुंबई – ०८ येथे होणार आहे.
ठाणे जिल्ह्याच्या शिवभोजन केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. रविवार, दि. २६ जानेवारी २०२० रोजी सकाळी. १०.३० वाजता श्रीमती अर्पिता अमित लोटलीकर व श्रीमती प्रेरणा प्रविण तावडे, लक्ष्मी कॅटरर्स, श्री.लक्ष्मी निवास, अर्जुन सदन समोर, लोकमान्य नगर पाडा नं. २, ठाणे (पश्चिम) येथे होणार आहे.