Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान; शिवसैनिक भडकले

शिवसेना उरण तालुक्याच्या वतीने जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांचं पोलिसांना निवेदन

उरण, दि.१(विठ्ठल ममताबादे): २४ जून २०२१ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाच्या मागणीकरिता सिडको भवन येथे मोर्चा काढण्यात आला होता. सदर मोर्चा मध्ये काही समाजकंटकांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे गलीच्छ अश्या प्रकारची शिवीगाळ केल्या असल्याचा व्हिडियो सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. असे गैरवर्तन केल्याने समस्त महाराष्ट्रातील शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्याबद्ल शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर आणि तालुकाप्रमुख संतोष ठाकूर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली उरण पोलीस स्टेशन व न्हावा शेवा पोलीस स्टेशन येथे निवेदन देऊन अशा समाजकंटकांना शोधून त्यांच्यावर फौजदारी गुन्ह्याची नोंद करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

व्हिडिओ पहा आणि आमच्या चॅनेल ला Subscribe करा

नवी मुंबई येथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्थानिक प्रकल्पग्रस्त, भूमीपुत्रांचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी करत भाजप आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी तसेच आगरी कोळी कराडी समाजाच्या विविध संघटनांनी लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव विमानातळाला देण्यात यावे यासाठी आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग घेतला. तर उरण, पनवेल तालुक्यासह नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण यामुळे पेटले असून यात अनेक राजकीय पक्षांनी सुद्धा उडी घेतली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडी तर्फे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यावर एकमत झाले आहे तर भाजप, वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी तसेच अन्य राजकीय पक्षांनी दिबा पाटील यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे हा वाद जास्तच चिघाळला. यात एकमेकांवर आरोप प्रत्यारोपही झाले. शेवटी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सिडको भवन येथे मोर्चा काढण्यात आला. या काढलेल्या मोर्चात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अश्लील, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केलेला व्हिडीओ व्हायरल झाला असून व्हाट्सअप, फेसबुकवर सुद्धा बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अपमान करण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्रातील समस्त शिवसैनिक या सोशल मीडियावरील अपमानामुळे आक्रमक झाले असून ज्यांनी ज्यांनी ठाकरे कुटुंबियांची सोशल मीडियावर बदनामी केली त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मुंबई, नवी मुंबई, रायगड जिल्ह्यातून शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे. उरण तालुक्यातील शिवसेनेसुद्धा याबाबत पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली आहे.

सोशल मीडियावर ठाकरे कुटुंबियांची बदनामी करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीचे निवेदन उरण पोलीस ठाणे, न्हावा शेवा पोलीस स्टेशन आदी ठिकाणी देण्यात आले यावेळी तालुकासंपर्कप्रमुख जे. पी. म्हात्रे, तालुकासंघटक बी. एन. डाकी, गटनेते गणेश शिंदे, शहरप्रमुख विनोद म्हात्रे, उपतालुकाप्रमुख जयवंत पाटील, विभागप्रमुख एस. के. पुरो, महिला उपजिल्हा संघटक ममता पाटील, तालुका संघटक सुजाता गायकवाड, जि.प. सदस्य विजय भोईर, पंचायत समिती सदस्य दिपक ठाकूर, उरण विधानसभा अधिकारी नितेश पाटील, ग्रा.पं.सदस्य धनेश ठाकूर, माजी नगरसेवक निलेश भोईर, शहरसंघटक महेश वर्तक, युवासेना रुपेश पाटील, युवासेना शहरअधिकारी नयन भोईर, शाखाप्रमुख अविनाश म्हात्रे, विकी म्हात्रे व शिवसैनिक उपस्थित होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *