Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

…तेव्हा दहशतवाद्यांची मातोश्री उडवण्याची योजना होती; नारायण राणे यांचा खळबळजनक दावा

…तेव्हा दहशतवाद्यांची मातोश्री उडवण्याची योजना होती; नारायण राणे यांचा खळबळजनक दावा

मुंबई: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी दावा केला आहे की १९८९ साली दहशतवाद्यांनी ठाकरे परिवाराचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ बंगल्याला बॉम्ब ने उडवण्याची योजना बनवली होती. ज्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना काही दिवसांसाठी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावं लागलं होतं.
त्यांनी आपल्या पुस्तकात दावा केला आहे की महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी बाळासाहेबांचे पुत्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केला आणि या धमकीची सूचना दिली होती. राणेंनी असाही दावा केला आहे की ठाकरे खलिस्तान्यांच्या हिटलिस्टवर होते. या चळवळीशी निगडित समर्थक मुंबईसह अनेक शहरात होते.

नारायण राणे यांच्यानुसार, १९ मार्च १९८८ ला बाळासाहेब ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद आयोजित केली होती, तिथे त्यांनी एक निवेदन वाटलं होतं. ज्यात मुंबईतल्या शिख समुदायातील लोकांकडून आश्वासन मागितलं होतं की ते खलिस्तानी चळवळीला साथ देणार नाहीत. तसेच बाळासाहेबांनी या पत्रकार परिषदेत घोषणा केली होती की जर शिखांनी दहशतवाद्यांना आर्थिक मदत केली तर त्यांच्यावर सामाजिक व आर्थिक स्वरूपात बहिष्कार टाकण्यात येईल.

नारायण राणे यांनी आपले आत्मचरित्र ‘No Holds Barred : My Years In Politics’ मध्ये तीन घटनांचा उल्लेख केला आहे. ते म्हणतात की शिवसेना १९८९ साली विधानसभेची निवडणूक हरली आणि या अपयशाने बाळासाहेबांना आणखीनच कमजोर स्थितीत आणून ठेवलं. त्यावेळी राज्याची सुरक्षा काँग्रेस च्या हाती होती. तरीही त्यांनी मातोश्री ची सुरक्षा वाढवून सर्वांना high अलर्ट वर ठेवलं. याच तणावग्रस्त वातावरणात नुकतंच लग्न झालेल्या उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री शरद पवार यांचा अचानक फोन आला, ज्यात त्यांनी उद्धव यांना भेटायला बोलावलं. विशेषतः त्यांना एकट्यानेच भेटायला बोलावलं कारण त्यांना एकांतात भेटायचं होतं.
राणेंच्या मते तत्कालीन मुख्यमंत्री पवार यांनी उद्धव ठाकरे यांची गुप्त भेट घेत त्यांना सावध केलं की मातोश्रीवर अतिरेक्यांचा हल्ला होऊ शकतो आणि ते शहरात दाखलही झाले आहेत.

नारायण राणे यांच्या आत्मचरित्रात असे बरेच खळबळजनक दावे आहेत. त्यामुळे अख्या महाराष्ट्राचे लक्ष त्याकडे लागले आहे.

अधिक बातम्यांसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

(Photo Credit : Shivraj Mane)

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *