कुलाबा व ठाणेनगर पोलिसांकडून अॅड. मनाली गवळी Manali Gawali यांना झालेल्या कथित अवैध अटकेविरोधात अॅड. नितीन सातपुते Adv Nitin Satpute उच्च न्यायालयात मांडणार यांची बाजू
मुंबई, दि. १०: भारतात सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी महिलांना अटक करू नये असा नियम आहे. पोलिसांनी या नियमाचा भंग केल्याचे आरोप अनेकदा झाले असून कित्येकदा मुंबई उच्च न्यायालयानेहि पोलिसांच्या अशा कृतीवर ताशेरे ओढले आहेत. असाच एक प्रकार मुंबईत एका वकील महिलेसोबत घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी अॅड. नितीन सातपुते यांनी उपलब्ध केलेल्या माहितीनुसार अॅड. मनाली गवळी यांना ठाणेनगर पोलिसांनी सायंकाळी ७:३० ते ८ वाजताच्या दरम्यान कुलाबा पोलीस ठाण्यातून अटक केली होती. हि अटक सूर्यास्तानंतर झाली असून ती नियमबाह्यरीतीने केल्याचा आरोप करत अॅड. गवळी यांचे बंधू संभाजी शिंदे यांनी अॅड. नितीन सातपुते Adv Nitin Satpute यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
उपलब्ध माहितीनुसार अॅड. मनाली गवळी Manali Gawali यांनी २००६ साली मुख्यमंत्री कोट्यातून एका सदनिकेसाठी अर्ज केला होता. तत्कालीन विभागीय अधिकाऱ्यांनी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करत अर्ज पात्र ठरवला व त्यांना सदनिका मंजूर केली. सदनिका प्राप्त झाल्यानंतर म्हाडाला दिलेल्या एका शपथपत्रात त्यांनी आपल्याकडे एक झोपडी असल्याची माहिती दिली होती. यानंतर त्यांना ठराविक रक्कम भरल्यावर सदनिका ताब्यात देण्यात आली. कालांतराने त्यांच्या मुलीसोबत त्यांचे घरगुती वाद सुरु झाले व या वादाने पुढे वेगळं वळण घेतलं. अॅडव्होकेट मनाली गवळी यांच्या मुलीने त्यांच्या विरोधात सदनिका घोटाळा केल्याचा आरोप करत संबंधित विभागाला एक तक्रार दिली होती. असा आरोप करण्यात येत आहे कि राजकीय दबावापोटी पोलिसांनी कोणतीही प्राथमिक चौकशी न करता अॅड. गवळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला व पुढे प्रथम वर्ग न्यायदंडधिकारी यांच्याकडे रात्रीच्या अटकेची मागणी केली. हि मागणी मान्य झाली व मनाली गवळी यांच्या विरोधात अटक वॉरंट काढण्यात आले.
अॅड. नितीन सातपुते Adv Nitin Satpute यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार याविरोधात अॅड. गवळी यांनी जामीन मिळवला व जामिनाची पूर्तता करण्यासाठी त्यांनी आपले भाऊ संभाजी शिंदे यांना सोबत घेत कुलाबा पोलीस स्थानक गाठले. यावेळी तपास अधिकारी अविनाश मोरे यांनी ठाणेनगर पोलिसांना मनाली गवळी यांच्या आगमनाची माहिती दिली व यानंतर ठाणेनगर येथून आलेल्या साध्या वेशातील पोलिसांनी अॅड. गवळी यांना अटक केली. हि अटक सायंकाळी ७:३० नंतर म्हणजेच सूर्यास्तानंतर केली गेली असून ती बेकायदेशीर आहे. यावेळी अटकेस विरोध करणाऱ्या अॅड. मनाली गवळी Manali Gawali यांना ठाणेनगर पोलिसांनी जबरदस्तीने खाजगी गाडीत ओढत नेले असा आरोप करण्यात आला असून कुलाबा व ठाणेनगर पोलिसांच्या याच कथित बेकायदेशीर अटकेविरोधात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. अॅड. नितीन सातपुते Adv Nitin Satpute यांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयात न्या. रेवती डेरे व न्या. पी. के. चव्हाण यांच्या खंडपीठासमोर सुनावणीस आली आहे. या प्रकरणी न्यायालयाकडून अशाच स्वरूपातील आधीच्या प्रकरणांत पोलिसांवर जसे ताशेरे ओढले गेले होते तसेच काहीसे घडते का हे पाहणं औत्स्युक्याचं ठरेल.
पोलिसांना सर्व साधारण नियमांचे आणि कायद्याचे भान नसणे दुर्दैवी आहे.कठोर कारवाई हवी.