Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान

दिवंगत पी. व्ही. नरसिंह राव, चौधरी चरणसिंग, डॉ. एम. एस. स्वामिनाथन व कर्पूरी ठाकूर यांना जाहीर झाला होता मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार

नवी दिल्ली, दि. ३०: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (३० मार्च २०२४) राष्ट्रपती भवन येथे आयोजित समारंभात यंदाचे भारतरत्न पुरस्कार प्रदान केले. या सोहळ्याला उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृह मंत्री अमित शाह आदि उपस्थित होते.

पुढील मान्यवरांना राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न बहाल करण्यात आले:

पी. व्ही. नरसिंह राव मरणोत्तर. दिवंगत पी. व्ही. नरसिंह राव यांच्या वतीने त्यांचे पुत्र पी. व्ही. प्रभाकर राव यांनी भारतरत्न पुरस्कार स्वीकारला.

माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग मरणोत्तर. स्वर्गीय चौधरी चरणसिंग यांच्या वतीने भारतरत्न हा पुरस्कार त्यांचे नातू जयंत चौधरी यांनी स्वीकारला.

डॉ. एम. एस. स्वामिनाथन मरणोत्तर. दिवंगत डॉ.एम.एस.स्वामिनाथन यांच्या वतीने त्यांच्या कन्या डॉ. नित्या राव यांनी भारतरत्न पुरस्कार स्वीकारला.

कर्पूरी ठाकूर मरणोत्तर. दिवंगत कर्पूरी ठाकूर यांच्या वतीने, त्यांचे पुत्र रामनाथ ठाकूर यांनी भारतरत्न पुरस्कार स्वीकारला.

 

 

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *