Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मनसे दहिसर विभागातर्फे पुलवामा हल्ल्यातील हुतात्म्यांना ३००० मेणबत्या लावून श्रद्धांजली 

MNS DAHISAR

मनसे दहिसर विभागातर्फे पुलवामा हल्ल्यातील हुतात्म्यांना ३००० मेणबत्या लावून श्रद्धांजली 

दहिसर: गुरुवारी जम्मू-काश्मीरच्या अवंतीपुरा भागात पुलवामा येथे जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने सीआरपीएफ जवानांच्या बसवर आत्मघाती हल्ला केला होता.

या हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात देशभरात सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. देशातील अनेक भागात या हल्ल्याच्या निषेधात मोर्चे काढण्यात आले. या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने दहिसर (पश्चिम) येथे कॅण्डल मार्च काढण्यात आला.

शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता दहिसर पश्चिम येथे असलेल्या बँक ऑफ बडोदा शाखेजवळ पुलवामा मध्ये शहिद झालेल्या जवानांच्या नावाने बॅनर लावून त्या बाजूला जवळपास ३ हजार मेणबत्त्या पेटवून हल्ल्यात शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

MNS DAHISAR
MNS DAHISAR

या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष कुणाल मेस्त्री यांनी केले.

यावेळी दहिसर विधानसभा क्षेत्रातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष राजेश येरूणकर, मनसे उपविभाग अध्यक्ष वसंत धोंडगे, पांडुरंग राणे, मनसे शाखा अध्यक्ष कैलास राऊत, अभिमन्यू नाईक, म.न.वि.से विभाग सचिव किरण गायकवाड, उपविभाग अध्यक्ष अमोद कदम, नरेंद्र भानसे, संकेत पवार, म.न.वि.से विद्यार्थिनी विभाग अध्यक्षा सुचिता टेंबुरकर, विद्यार्थिनी विभाग सचिव प्रियंका थोरात, जनहित कक्षाचे विभाग अध्यक्ष निखिल मेस्त्री, रस्ते आस्थापनाचे अविनाश मयेकर, महिला उपविभाग अध्यक्षा अपूर्वा कदम, महिला शाखा अध्यक्षा वृंदा जाधव, अनिता दत्ता शिर्के, म.न.वि.से वार्ड अध्यक्ष शैलेश मिश्रा, अजय वारस्कर, कौस्तुभ सुर्वे, सागर मोरे यांसह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच परिसरातील स्थानिक नागरिकही यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MNS DAHISAR
MNS DAHISAR

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *