Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मुंबई शहर: निवडणूक काळात नाकाबंदी दरम्यान जर तुमची रक्कम जप्त झाली असेल दाद मागण्याकरिता ‘या’ क्रमांकावर संपर्क साधा

मुंबई शहर: निवडणूक काळात नाकाबंदी दरम्यान जर तुमची रक्कम जप्त झाली असेल दाद मागण्याकरिता ‘या’ क्रमांकावर संपर्क साधा

मुंबई, दि. १० : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ कालावधीत मुंबई शहर जिल्ह्यात जप्त करण्यात आलेल्या रोख रकमेबाबत सामान्य जनतेला दाद मागण्याकरिता ०२२-२०८२२६९३ हा दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती, मुंबई शहराचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्यामसुंदर सुरवसे यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात २० मे, २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवसापर्यंत मुंबई शहर हद्दीत पोलीस/भरारी पथक/स्थिर सर्वेक्षण पथकाद्वारे जप्त केलेल्या रोख रकमेबाबत (निवडणूक प्रचारासंदर्भात नसेल/तक्रार दाखल नसेल तर) सर्वसामान्य जनतेला दाद मागण्याकरिता या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन सुरवसे यांनी केले आहे.

भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कालावधीत जप्त केलेली रक्कम निवडणुकीसंदर्भात नसल्याचे दिसून आल्यास मुक्त करणेबाबत मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात ३० – मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ व ३१- मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी जप्तीबाबत तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती जप्त वस्तू/रकमेबाबत निर्णय घेणार आहे. समिती मतदानानंतर ७ दिवसापर्यंत कार्यरत राहील.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *